सनातन संस्थेचे राष्ट्रहितैषी उपक्रम

 

‘सनातन संस्था’ ही ऋषीमुनी आणि संत-महंत यांनी धर्मशास्त्र हा आधारस्तंभ मानून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उन्नतीचा जो मार्ग दाखवला, त्यानुसार कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. ‘सनातन संस्थे’चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते. स्वसंरक्षण प्रशिक्षण, प्रथमोपचार प्रशिक्षण, आपत्कालीन साहाय्य प्रशिक्षणवर्ग आणि अग्नीशमन प्रशिक्षणवर्ग या राष्ट्रहितैषी उपक्रमांचा आरंभ सनातनने १० – १५ वर्षांपूर्वीच अत्यंत दूरदृष्टीने केला. त्याविषयी सनातनचे विविध ग्रंथही प्रकाशित झाले आहेत. आताही सनातनचे साधक अन्य संघटना राबवत असलेल्या विविध राष्ट्रहितैषी उपक्रमांत सहभागी होतात.

  • विनामूल्य प्रशिक्षणवर्ग,
  • अग्निशमन प्रशिक्षणवर्ग
  • भ्रष्टाचारविरोधी चळवळ
  • राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा मोहीम
  • फटाक्यांमुळे होणा-या हानीविषयी प्रबोधन
  • भाषाशुद्धि आणि भाषिक अस्मिता जागृति चळवळ
  • भूकंप आणि पूरग्रस्त यांना साहाय्य करणा-या पथकांमध्ये सहभाग

यांसारखे राष्ट्रहितैषी कार्य जाणून घ्या !

 

संबंधित बातम्या