गुरुपौर्णिमा (Gurupurnima 2023)

गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम्

गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो. या वर्षी गुरुपौर्णिमा ३ जुलै २०२३ या दिवशी आहे. गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात. वर्षभर प्रत्येक गुरु आपल्या भक्तांना अध्यात्माचे बोधामृत भरभरून देत असतात. अशा गुरूंच्या प्रती अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करणे, हा गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागील उद्देश आहे.

गुरुपौर्णिमा महोत्सव २०२३

प्रतिवर्षी अनेक जण एकत्रित येऊन त्यांच्या संप्रदायानुसार गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करतात. सनातन संस्था आयोजित गुरुपौर्णिमेचा ऑनलाईन कार्यक्रम येथे लाईव्ह पहा !

देवाने ह्रदयात सगळे भाव दिले; पण समाधान (आनंद किंवा शांती) केवळ गुरुच देतात. देवाने ते दिले नाही.

– प.पू. भक्तराज महाराज

गुरुपौर्णिमा महोत्सव

WATCH LIVE

DAYS
HOURS
MINUTES
SECONDS

July 2, 2023, 5.30 PM

July 3, 2023, 7.30 PM

July 3, 2023, 8.00 PM

July 3, 2023, 7.00 PM

July 3, 2023, 7.30 PM

July 3, 2023, 6.00 PM

स्थानिक स्तरावर गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभागी व्हा !

सनातन संस्था भारतभरात ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा महात्सव आयोजित करत असते. आपल्या जिल्ह्यातील गुरुपौर्णिमा महोत्सवात प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी जवळच्या कार्यक्रमाचे स्थळ खालील सारणीत पहा !

गुरुपौर्णिमा महत्त्व

‘गुरु-शिष्य परंपरा’ ही हिंदूंची लक्षावधी वर्षांची चैतन्यमय संस्कृती आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपूजन होते, तसेच गुरु-शिष्य परंपरेची महती समाजाला सांगता येते. थोडक्यात गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु-शिष्य परंपरेचे जतन करण्याची सुसंधीच होय !

गुरुपौर्णिमा या दिवशी गुरु तत्त्व (ईश्वरी तत्त्व) नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेली सेवा आणि त्याग (सत्साठी अर्पण) यांचा इतर दिवसांच्या तुलनेत १ सहस्र पटीने लाभ होतो; म्हणून गुरुपौर्णिमा ही गुरु कृपेची (ईश्वर कृपेची) एक अनमोल पर्वणीच आहे.

गुरुपौर्णिमा संत संदेश

गुरुपौर्णिमा साजरा करण्याची पद्धत

प्रत्येक गुरूंचे शिष्य या दिवशी त्यांच्या गुरूंची पाद्यपूजा करतात आणि त्यांना गुरुदक्षिणा मनोभावे अर्पण करतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. गुरुपरंपरेत महर्षि व्यास यांना सर्वश्रेष्ठ गुरु मानले आहे. सर्व ज्ञानाचा उगम महर्षि व्यास यांच्यापासून होतो, अशी भारतियांची धारणा आहे.

मंत्र आणि त्याच्या अर्थासहित

गुरु पूजन

गुरुपौर्णिमा या दिवशी भावपूर्णरित्या गुरु पूजन करावे. संपूर्ण गुरु पूजन त्यातील मंत्र आणि त्यांच्या अर्थासहित जाणून घेण्यासाठी…

मंत्र आणि त्याच्या अर्थासहित

गुरु पूजन

गुरुपौर्णिमा या दिवशी भावपूर्णरित्या गुरु पूजन करावे. संपूर्ण गुरु पूजन त्यातील मंत्र आणि त्यांच्या अर्थासहित जाणून घेण्यासाठी…

गुरु-शिष्य परंपरा

गुरु-शिष्य परंपरा’ म्हणजे भारताचे कमीतकमी शब्दांत सांगता येईल असे वैशिष्ट्य होय ! गुरूंशिवाय तरणोपाय नाही. शिष्याच्या जीवनातील अंध:काराचा नाश करून त्याचे परब्रह्माशी मिलन घडवून आणण्याचे कार्य गुरु करतात. ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरु आणि गुरूंचे निर्गुण रूप म्हणजे ईश्वर अशी अनेक वैशिष्ट्ये गुरूंबद्दल सांगता येतील.

सनातनची गुरु परंपरा

गुरूंप्रती भाव वाढवण्यासाठी हे करा !

  • सेवेच्या माध्यमातून साक्षात् गुरूंच्या सेवेत सहभागी होऊन स्वत:चा उद्धार करून घ्या.
  • भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले आहे, त्या स्थितीत भगवंताला अपेक्षित असे प्रयत्न तळमळीने वाढवा.
  • दिवसभर अधिकाधिक गुरू तत्त्व ग्रहण होण्यासाठी भावपूर्ण प्रार्थना करा.
  • गुरूंनी आपल्यावर केलेल्या प्रीतीसाठी त्यांच्याप्रती अधिकाधिक कृतज्ञता व्यक्त करा.
  • सकाळी गुरूंची मानस पूजा करा.
  • गुरूंनी दिलेला नामजप (अथवा गुरुमंत्राचा जप) अधिकाधिक करा. गुरु नसल्यास गुरुप्राप्तिसाठी कुलदेवतेचा नामजप करा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपेने गुरुकृपायोगानुसार साधना विकसित केली आहे. गुरुकृपायोगानुसार साधना हा मोक्षप्राप्तीचा (ईश्वरप्राप्तीचा) सर्वात जलद गतीचा मार्ग आहे. याची अनुभूती अनेक साधकांनी घेतली आहे, तुम्ही पण घ्या !

सनातन संस्थेच्या ऑनलाइन सत्संगात सहभागी व्हा !

गुरु-शिष्य संबंधी ग्रंथ

गुरूंचे महत्त्व, गुरूंचे प्रकार, गुरुमंत्र, गुरूंचे शिष्यांना शिकवणे, गुरु-शिष्य संबंध, आदर्श शिष्य कसे बनावे या संबंधी अनमोल मार्गदर्शन करणारे ग्रंथ वाचा !

गुरुपौर्णिमा संबंधी व्हिडीओ पहा !

प्रतिवर्षी अनेक जण एकत्रित येऊन त्यांच्या संप्रदायानुसार गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करतात. परंतु आपत्काळात (उदा. कोरोना महामारी) एकत्रित येऊन गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करू शकत नाही. अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी हिंदु धर्माने धर्माचरणात काही पर्याय सांगितले आहेत. याला ‘आपद्धर्म’ म्हणतात. आपद्धर्म म्हणजे ‘आपदि कर्तव्यो धर्मः ।’ म्हणजे आपदेत (आपत्तीत) आचरण्याचा धर्म. येथे महत्त्वाचे सूत्र असे की, हिंदु धर्माने कोणत्या स्तरापर्यंत जाऊन मानवाचा विचार केला आहे, हे शिकायला मिळते. यातून हिंदु धर्माचे एकमेवाद्वितियत्व अधोरेखित होते.

पुढे आपत्काळात धर्माचरण म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करता येऊ शकेल, याचा विचार करण्यात आला आहे.

१. गुरुपौर्णिमेच्या दिवशी बहुतेक जण त्यांच्या श्री गुरूंकडे जाऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार कुणी श्री गुरु, कुणी माता-पिता, कुणी विद्यागुरु (ज्यांनी आपल्याला ज्ञान दिले, ते शिक्षक), कुणी आचार्यगुरु (आपल्याकडे परंपरागत पूजेसाठी येणारे गुरूजी), तर कुणी मोक्षगुरु (ज्यांनी आपल्याला साधनेची दिशा देऊन मोक्षाचा मार्ग दाखवला, ते श्री गुरु) यांच्याकडे जाऊन त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. आपत्काळात आपण घरी राहून भक्तीभावाने श्री गुरूंच्या छायाचित्राचे पूजन किंवा मानसपूजन भावपूर्ण केल्यानेही आपल्याला गुरुतत्त्वाचा एक सहस्र पटीने लाभ होईल. प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार उपास्यदेवता, संत किंवा श्री गुरु निराळे असले, तरी गुरुतत्त्व एकच असते.

२. संप्रदायातील सर्व भक्तांनी पूजनाची एक वेळ निश्‍चित करून शक्यतो त्याच वेळेत आपापल्या घरी पूजन करावे. ‘एकाच वेळेत पूजन केल्याने संघटित शक्तीचा अधिक लाभ होतो’, यासाठी सर्वानुमते शक्यतो एक वेळ निश्‍चित ठरवून त्या वेळी पूजन करावे.

अ. सकाळची वेळ पूजनासाठी उत्तम मानली आहे. ज्यांना सकाळी पूजा करणे शक्य आहे, त्यांनी सकाळची वेळ ठरवून त्या वेळी पूजा करावी.

आ. काही अपरिहार्य कारणामुळे ज्यांना सकाळी पूजा करणे शक्य नाही, त्यांनी सायंकाळची एखादी वेळ निश्‍चित करून त्या वेळी; परंतु सूर्यास्तापूर्वी, म्हणजे सायंकाळी ७ वाजण्यापूर्वी पूजा करावी.

इ. ज्यांना ठरवलेल्या निश्‍चित वेळेत पूजा करणे शक्य नाही, त्यांनी आपापल्या वेळेनुसार; मात्र सूर्यास्तापूर्वी पूजा करावी.

ई. प्रत्येकाने आपापल्या संप्रदायानुसार श्री गुरु अथवा उपास्यदेवता यांचे चित्र, मूर्ती किंवा पादुका यांचे घरी पूजन करावे.

उ. चित्र, मूर्ती किंवा पादुका यांना गंध लावून पुष्प वहावे. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून पंचोपचार पूजा करावी. नंतर श्री गुरूंची आरती करावी.

ऊ. ज्यांना साहित्याच्या अभावामुळे प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नाही, त्यांनी श्री गुरु किंवा उपास्यदेवता यांची मानसपूजा करावी.

ए. नंतर श्री गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करावा. श्री गुरु आपल्या आयुष्यात आल्यानंतर आलेल्या अनुभूतींचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.

ऐ. त्या वेळी ‘वर्षभरात आपण साधनेत कुठे न्यून पडलो ? आपण श्री गुरूंची शिकवण किती प्रमाणात आचरणात आणली ?’, याचेही सिंहावलोकन करून त्यावर चिंतन करावे.’