लासलगाव (जिल्हा नाशिक) : युवकांना व्यसनाच्या आहारी ढकलणार्‍या सनबर्न फेस्टीव्हलला हिंदुत्वनिष्ठांचा विरोध !

आंदोलनात उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

लासलगाव (जिल्हा नाशिक) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

लासलगाव (जिल्हा नाशिक) – पाश्‍चात्त्य चंगळवादाला खतपाणी घालणार्‍या, हिंदु संस्कृतीला घातक असणार्‍या आणि युवक-युवतींंनी व्यसनाच्या आहारी ढकलणार्‍या ‘सनबर्न फेस्टीव्हल’ला अन् हिंदुत्वनिष्ठांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या षड्यंत्राला येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करण्यात आला. लासलगाव (नाशिक) येथे नुकत्याच झालेल्या आंदोलनात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ३० हून कार्यकर्ते अन् पदाधिकारी यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन विरोध दर्शवला.

या वेळी राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील वक्ते श्री. शशिधर जोशी यांनी सांगितले की, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांसारख्या पुरोगाम्यांच्या हत्येप्रकरणी विविध संशयितांना पकडून सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांना येनकेन प्रकारे गुंतवण्याचे कटकारस्थान रचले जात आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो. त्याचसमवेत शबरीमला मंदिरातील शेकडो वर्षांपूर्वीच्या धर्मपरंपरेचे रक्षण करण्यासाठी संसदेने त्वरित कायदा करावा आणि धर्मपरंपरेच्या रक्षणार्थ आंदोलन करणार्‍या सहस्त्रो भक्त आंदोलकांवरील गुन्हेही त्वरीत मागे घेण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment