सनातन संस्थेच्या वतीने देहली येथे जीवनावश्यक वनस्पतींचे वृक्षारोपण

देहली – सध्या वाढत असलेले प्रदूषण पहाता आज प्रत्येक भारतियाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून सनातन संस्थेच्या वतीने अलकनंदा येथील ‘मंदाकिनी एन्क्लेव्ह’ या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी कडूलिंब, आंबा, लिंबू, डाळींब, पपई इत्यादी २१ समाजोपयोगी वृक्ष लावण्यात आले. या प्रसंगी ‘मंदाकिनी एन्क्लेव्ह रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन’चे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

Leave a Comment