काश्मीरप्रमाणे देशात ‘इस्लामिक स्टेट’ येण्यापूर्वी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा ! – चेतन राजहंस

श्री. चेतन राजहंस

प्रयागराज (कुंभनगरी), ६ फेब्रुवारी (वार्ता.)  – वर्ष १९९० मध्ये काश्मीर खोर्‍यामध्ये ‘रलिव्ह’, ‘चलिव्ह’ आणि ‘गलिव्ह’, अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. याचा अर्थ ‘इस्लाम स्वीकारा, काश्मीर सोडा अथवा मृत्यूला सामोरे जा’, असा होतो. त्यानंतर ७ लक्ष ५० सहस्र हिंदू काश्मीरमधून विस्थापित झाले. आता कैराना, बंगाल आणि आसाम येथून हिंदूंचे विस्थापन होत आहे. हा आतंकवाद आपल्या रस्त्यावर अथवा घरात येण्यापूर्वी हिंंदूंनी ‘भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा’, अशी मागणी केंद्रातील सत्ताधार्‍यांकडे केली पाहिजे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी येथे केले.

‘प्रखर परोपकार मिशन’ने ४ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ‘काश्मिरी हिंदूंच्या यातना, लव्ह जिहाद आणि सनातनचे हिंदु राष्ट्रविषयक कार्य’ या चलचित्रांचे प्रसारण करण्यात आले. कार्यक्रमानंतर अनेकांनी आपल्या भागात असे धर्मजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment