सनातन संस्थेच्या विश्‍वकल्याणकारी धर्मकार्यात यथाशक्‍ती सहभागी व्हा !

१. देशात चालू असलेले सनातन संस्थेचे कार्य आणि
निःस्वार्थी वृत्तीने अन् समर्पित भावाने विविध उपक्रम राबवणारे सनातनचे साधक !

आपण सनातन संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती पाहिली. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, उत्तरप्रदेश, हरियाणा, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांत सनातनचे कार्य चालू आहे. या राज्यांतील संस्थेचे साधक (कार्यकर्ते) वरील सर्व समाजहितोपयोगी आणि राष्ट्र अन् धर्म यांचा उत्कर्ष साधणारे उपक्रम विनामूल्य, सेवाभाव आणि निःस्वार्थी वृत्तीने करत आहेत. अनेक उच्चविद्याविभूषित साधकांनी या कार्याला वाहून घेतले आहे. अनेक जण या कार्यात सहकुटुंब सहभागी होऊन समर्पित भावाने सेवारत आहेत.

आपणांस या धर्मकार्यात सहभागी व्हायचे असल्यास कृपया हा अर्ज भरून पाठवावा.

image

 

२. धर्मकार्यासाठी योगदान देऊ इच्छिणार्‍यांनी सनातन संस्थेच्या कार्यात सहभागी व्हा !

विविध प्रकारे सहभागी होण्यासाठीची उदाहरणे

२ अ. आपल्या राज्यांत धर्मप्रसाराच्या कार्यात कृतीशील व्हा !

जम्मू, हिमाचल प्रदेश, चंडीगढ, पंजाब, उत्तरांचल, बिहार, आसाम आदी राज्यांत सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य चालू करण्याविषयी मागणी आहे. अशा वेळी अवघ्या मानवजातीच्या कल्याणासाठी झटणार्‍या संस्थेच्या धर्मकार्यात आपण जेथे असाल, तेथून आपल्या क्षमतेप्रमाणे आणि आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहात, त्यानुसार या धर्मकार्यात पुढीलप्रमाणे विविध प्रकारे सहभागी होऊ शकता.

२ अ १. संस्थेच्या उपक्रमांसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देणे

मंगल कार्यालये, मंदिराचे विश्‍वस्त, सभागृहांचे मालक आदी मान्यवर सनातन संस्थेचे धर्मशिक्षणवर्ग, संस्कारवर्ग, सत्संग सोहळे, हिंदुत्वविषयक प्रदर्शन आदींच्या आयोजनासाठी जागा उपलब्ध करून देऊ शकतात. ज्यांची घरे किंवा दुकाने मुख्य रस्त्याच्या लगत आहेत, ते धर्मफलक किंवा संस्थेच्या उत्पादनांच्या विज्ञापनांचे फलक लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ शकतात.

२ अ २. स्वतः धर्मकार्यात सहभागी होणे

स्वतः धर्मशिक्षण फलकांचे लिखाण करणे, कापडी फलक बांधणे, धर्मप्रसार करणे, स्वतःचे घर/दुकान यांच्या बाहेरील भिंतींवर धर्मप्रबोधन करणारे लिखाण रंगवून घेणे, स्वतःला शक्य नसल्यास संस्थेच्या साधकांना धर्मशिक्षणाचे लिखाण करण्यास सांगणे, संस्थेने आयोजित केलेल्या रक्‍तदान, तसेच आरोग्य कार्यशाळा, स्वच्छता चळवळ, क्रांतीकारकांचे प्रदर्शन आदींमध्ये सहभागी होऊन स्वतः या धर्मकार्यात सहभागी होऊ शकता. लग्नपत्रिका, ओळखपत्र आदींवर रिकाम्या जागी धर्मजागृतीपर लिखाण प्रसिद्ध करून धर्मप्रसार करू शकता.

२ आ. आर्थिक साहाय्य करणे

कोणत्याही कार्यपूर्तीसाठी मनुष्य बळाइतकीच आर्थिक बळाचीही आवश्यकता भासते. समाज आणि साधक यांच्याकडून प्राप्त अर्पण, सनातन संस्थेचे ग्रंथ अन् नियतकालिके यांच्या वितरणातून जमा होणार्‍या आर्थिक राशीच्या माध्यमातून सनातन संस्थेचे प्रसारकार्य चालू आहे; मात्र सध्या सनातन संस्थेने उचललेल्या कार्याचे शिवधनुष्य पहाता संस्थेला आणखी साहाय्याची आवश्यकता आहे. सनातन संस्थेचे विश्‍वकल्याणकारी कार्य पूर्तीस नेण्यास ईश्‍वर समर्थ आहेच; मात्र या निमित्ताने सनातन संस्थेच्या कार्यात यथाशक्‍ती सहभागी होण्याची संधी धर्मकार्यात योगदान देऊ इच्छिणार्‍या प्रत्येकाला प्राप्त होणार आहे. या संदर्भातील ‘८० जी’ देणगी अंतर्गत सवलतीच्या पावत्याही उपलब्ध आहेत. काही जण त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार प्रतिमाह नियमितपणे धन अर्पण करू शकतात.
image

२ इ. वस्तूरूपाने साहाय्यकरणे

आपल्याकडील जुने; पण सुस्थितीत असलेले लाकडी साहित्य (फर्निचर), मोठी भांडी, संगणक, पंखे, फॅक्स यंत्र, दूरचित्रवाणीसंच, गिझर, छायाचित्रक (कॅमेरा) इत्यादी विद्युत उपकरणे, तसेच दुचाकी आणि चारचाकी गाड्या अर्पण करणे. अर्पणात मिळालेल्या अशाच वस्तूंची थोडीफार डागडुजी करून साधक या वस्तूंचा उपयोग वरील धर्मकार्यासाठी करू शकतील.

२ ई. स्वत:च्या व्यावसायिक कौशल्याचा उपयोग `धर्मकार्या’साठी करणे

आपण वैद्य (डॉक्टर) असाल, तर साधकांसाठी अल्प मूल्यात उपचार उपलब्ध करून देणे, संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी आयोजित केल्या जाणार्‍या विनामूल्य आरोग्य कार्यशाळेत विनामूल्य सेवा देणे, बांधकाम क्षेत्रात असल्यास आश्रमाच्या बांधकामासाठी लागणारी साधनसामुग्री लाभदायक (किफायतशीर) मूल्यात उपलब्ध करून देणे, लेखा परीक्षक (ऑडिटर), सनदी लेखापाल (सी.ए.), छायाचित्रकार, पत्रकार, तसेच संगणक, विद्युत, ध्वनीचित्रीकरण इत्यादी विषयांमधील अभियंते आणि कौशल्यप्राप्त तज्ञ व्यक्‍ती यांच्या ज्ञानाचा वापर सनातन संस्थेने आरंभलेल्या `धर्मकार्या’त व्हावा, यासाठी सनातन संस्थेच्या उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष साहाय्य करून सहभागी होऊ शकतात.

२ उ. विज्ञापने देणे, प्रायोजक होणे किंवा प्रायोजक मिळण्यासाठी साहाय्य करणे

सनातन संस्थेच्या वतीने प्रसिद्ध होणार्‍या विविध भाषांतील नियतकालिकांमध्ये आपण नियमित विज्ञापने देऊ शकता. तसेच संस्थेच्या वतीने मंदिरे, मंगल कार्यालये अशा विविध सार्वजनिक ठिकाणी धर्मशिक्षण देणारे `फ्लेक्स’ फलक, प्रबोधनात्मक कागदी फलक आदी लावण्यात येतात. धर्मशिक्षण देणारी आणि गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, होलिकोत्सव, दीपावली यांसारख्या सणांमधील अपप्रकारांच्या विरोधात धर्मजागृती करणारी पत्रके प्रसिद्ध विनामूल्य वितरित करण्यात येतात. ही हस्तपत्रके, कागदी फलक आणि `फ्लेक्स फलक’ यांच्या व्ययाची रक्कम प्रायोजक म्हणून देता येईल. इतरांना प्रायोजक बनण्यासाठी सांगू शकता किंवा स्वतः प्रायोजक मिळवू शकता.

२ ऊ. अन्नदान करणे

आश्रमात राहून धर्मकार्य करणार्‍या साधकांना अन्नदान करणे.

२ ए. संकेतस्थळाच्या माध्यमातून धर्मकार्यात सहभागी व्हा !

१. संकेतस्थळावरील लेखांचा प्रसार संगणकीय पत्रे, तसेच ‘फेसबुक’, ‘टि्वटर’, ‘गूगल प्लस’ ही संकेतस्थळे आणि ‘ऑनलाईन ग्रुप्स’ यांद्वारे करा !

Sanatan.Org ची अधिकृत पाने (Pages) आणि खाते (Profile ):

Telegram : https://t.me/SSMarathi   and https://t.me/SanatanSanstha

Pinterest : https://in.pinterest.com/sanatansanstha/

‘Twitter’ खाते : https://twitter.com/sanatansanstha

२. संकेतस्थळावरील अध्यात्मशास्त्रीय लेख त्या त्या संकेतस्थळाच्या मार्गिकेसह स्वतःच्या ब्लॉगवर ठेवा. तसेच ते लिखाण वृत्तपत्रांत प्रसिद्धीसाठी द्या !

३. संकेतस्थळावरील मराठी लिखाणाचे इंग्रजी, हिंदी आणि कन्नड या भाषांत भाषांतराची सेवा करण्यासाठी प्रतिदिन शक्य तितका वेळ द्या, तसेच त्यासाठी इतरांनाही उद्युक्त करा !

४. आपल्या तांत्रिक शिक्षणाचा आणि अनुभवाचा धर्मप्रसारासाठी उपयोग करा !

धर्मप्रसाराच्या या ईश्वरी कार्यात आपण संकेतस्थळाशी संबंधित आपले तांत्रिक शिक्षण आणि अनुभव यांद्वारे सहभागी होऊ शकता ! उदा. Web Designinig and Development, SEO and Web Promotion, Mobile Compatibility, Mobile Application Development (Android, Windows, iOS etc.), Mass Emailing Server इत्यादी.

२ ऐ. सनातनची ग्रंथसंपदा, ध्वनीचकत्या (सीडी), ध्वनीचित्र-चकत्या (व्हीसीडी) आणि सात्त्विक उत्पादने यांचा स्वतः लाभ घेऊन इतरांनाही लाभ मिळवून द्या !

१. धार्मिक कृती, आचारधर्माचे पालन आदी विषयांवरील सनातनचे ३२३ हून अधिक ग्रंथ वाचा. त्यांतील ज्ञान आचरणात आणा आणि त्याविषयी इतरांनाही सांगा.

२. हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे, या उद्देशाने वाचनालये, शैक्षणिक संस्था, मंदिरे, आश्रम, मंडळे अशा सार्वजनिक ठिकाणी ही ग्रंथसंपदा भेट द्या.

३. धर्मशिक्षण देणार्‍या आणि साधना सांगणार्‍या ध्वनीचित्र-चकत्यांद्वारे (व्हिसीडींद्वारे) कुटुंबीय, शेजारी आदींसाठी सत्संग चालू करा. तेच सत्संग स्थानिक केबल वाहिनीवर दाखवण्यासाठीही प्रयत्न करू शकतो.

४. सनातनच्या पूजोपयोगी, नित्योपयोगी आणि आयुर्वेदिक सात्त्विक उत्पादनांचे ‘मासिक ग्राहक’ बना आणि इतरांनाही बनवा.

५. मुलांना प्रतिवर्षी सनातनच्या ‘संस्कार वह्या’ वापरण्यास द्या.

६. सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने विवाहादी सोहळे, दीपावली, हळदी-कुंकू आदी प्रसंगी भेट द्या.

सनातन संस्थेच्या वरील विनामूल्य उपक्रमांत स्वयंसेवक, प्रायोजक किंवा
अन्य हेतूने सहभागी होऊन धर्म आणि राष्ट्र यांच्याप्रती असलेले आपले कर्तव्य बजावा !

आपणांस या धर्मकार्यात सहभागी व्हायचे असल्यास कृपया हा अर्ज भरून पाठवावा.

image

5 thoughts on “सनातन संस्थेच्या विश्‍वकल्याणकारी धर्मकार्यात यथाशक्‍ती सहभागी व्हा !”

  1. सदर आपल्या सनातन पंचांगात 1 अगस्ट या तारखेला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती चा उल्लेख का नाही केला या बद्दल आपण माहिती द्यावी ही विनंती…

    Reply
    • नमस्कार,

      सनातन पंचांग हे धार्मिक विचारांचे असल्याने त्यात धार्मिक क्षेत्रांतील मान्यवरांचे स्मृतीदिना उल्लेख करण्यास प्राधान्य दिले जाते.

      Reply
  2. आम्ही सांगली जिल्हा शिराळा तालुका सांगाव येथिल पोटगाव ढोलेवाडी येथिल रहिवासी आहेत आम्ही चारशेहून अधिक लोकांचा कट्टर हिंदू ग्रुप
    वत आहोत हे सर्व हिंदू कट्टर हिंदू आहेत यांना सद्या हिंदू संस्कार काय आहेत याची सविस्तर माहिती देण्यात यावी यासाठी आम्हास या संस्थेत सहभागी व्हायच आहे जनेकरुन धर्म प्रसारासाठी माझा खारीचा वाटा असावा व माझ्या कट्टर हिंदू ग्रुप चा ही सहभाग हवा आहे

    Reply
    • नमस्कार,

      आम्हाला संपर्क केल्याबद्दल संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. आजच्या आधुनिक काळातही आपण हिंदु धर्माप्रमाणे आचरण करण्यास कटीबद्ध आहात आणि त्या विषयी अजून सविस्तर जाणून घेऊ इच्छिता हे पाहून आनंद झाला.

      कृपया आपली माहिती http://www.Sanatan.org/Sampark या लिंकवर भरावी, म्हणजे साधक आपल्याला याविषयी संपर्क करू शकतील.

      Reply

Leave a Comment