श्री गणेश चतुर्थी
श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटीने कार्यरत असते.
या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो. गणेशोत्सव आदर्शरित्या कसा साजरा करा, गणेशमूर्ती अन् निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जित का करावे, याविषयीची माहिती पुढील लेखांतून समजून घेऊया.
सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो. गणेशभक्तांना ही पूजा भावपूर्ण करता यावी, या उद्देशाने श्री गणेशपूजनाशी संबंधित काही कृती आणि त्यांमागील शास्त्र पुढे सांगितले आहे. आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती जाणून घेऊया.
श्री गणेश चतुर्थी पुजाविधी (Audio)
श्री गणपति, त्याची उपासना आणि उपासनेमागील शास्त्र
अधिक माहिती वाचा…
श्री गणपतीशी संबंधित व्रते
सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती
श्री गणपतीची आरती, स्तोत्रे, नामजप आणि सात्त्विक रांगोळ्या
अष्टविनायक आणि श्री गणपतीची मंदिरे

श्री गणेश चतुर्थी शास्त्रानुसार कशी साजरी करावी ?
गणेशोत्सव : आत्मावलोकनाची आवश्यकता !
समाजाची दिशाभूल थांबवा !
विदेशातील प्राचीन हिंदु संस्कृतीच्या पाऊलखुणा !
साधिकेने रेखाटलेली श्री गणेशाची विविध रूपांतील चैतन्यदायी चित्रे
कलेचे कोणतेही लौकीक शिक्षण न घेताही साधिकेने अत्यंत सुबक चित्रे रेखाटली आहेत. त्या चित्रांपैकी काही चित्रे येथे प्रसिद्ध करत आहोत. केवळ साधिकेतील ईश्वराप्रतीच्या भावामुळे ही चित्रे पहाणार्याची भावजागृती होते. ईश्वरप्राप्तीच्या ध्येयाने निर्माण झालेली आणि ईश्वराशी (ईश्वराच्या गुणांशी) एकरूप होण्यास साहाय्यभूत होते, तीच खरी कला !