सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांचा साठा इतरत्र पाठवण्यासाठी आवश्यक असलेली खोकी अन् प्लास्टिक देऊन वा त्यासाठी धनरूपात साहाय्य करून धर्मकार्यात हातभार लावावा !

‘सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांना समाजातून पुष्कळ मागणी येत आहे. भारतभरातील विविध जिल्ह्यांना त्यांच्या मागणीनुसार ग्रंथ आणि उत्पादने यांचा पुरवठा करण्याची सेवा सनातनचा देवद येथील आश्रम आणि मंगळूरू येथील सेवाकेंद्र, येथे केली जाते.

सनातनच्या आश्रमांसाठी वातानुकूलन यंत्रे देऊन किंवा त्यासाठी धनरूपात साहाय्य करून धर्मकार्यात हातभार लावा !

राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी अधिकाधिक वेळ देणारे साधक, तसेच धर्मप्रेमी यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सध्या आश्रम आणि सेवाकेंद्रे यांचे नव्याने बांधकाम, तसेच नूतनीकरण (रिनोव्हेशन) करणे चालू आहे. यासाठी वातानुकूलन यंत्रांची (‘इन्व्हर्टर स्प्लिट एअर कंडिशनर’ची) तातडीने आवश्यकता आहे.

सर्वत्रच्या अर्पणदात्यांना अन्नदान करण्याची सुसंधी !

अन्नदान करणे, हे श्रेष्ठ कर्म मानले जाते. हिंदु धर्मशास्त्रानुसार जो गृहस्थ अर्थार्जन करतो आणि ज्याच्या घरी प्रतिदिन अन्न शिजते, त्याने अन्नदान करणे, हे त्याचे कर्तव्यच आहे.

सनातनच्या आश्रमांचे बांधकाम, तसेच नूतनीकरण करणे चालू असल्याने पंख्यांची (फॅनची) तातडीने आवश्यकता !

सध्या आश्रम आणि सेवाकेंद्रे यांचे नव्याने बांधकाम, तसेच नूतनीकरण (रिनोव्हेशन) करणे चालू आहे. यासाठी पंख्यांची (फॅनची) तातडीने आवश्यकता आहे.

सनातनने प्रकाशित केलेले इंग्रजी ग्रंथ आणि पाक्षिक यांमध्ये भाषांतराच्या दृष्टीने सुधारणा कळवून साहाय्य करा !

आतापर्यंत प्रकाशित झालेल्या ग्रंथांमध्ये भाषांतरातील काही त्रुटी वाचकांना लक्षात आल्या असतील, तर त्यांनीही त्या योग्य सुधारणांसह कळवाव्यात. त्यामुळे लिखाणाची गुणवत्ता आणि अचूकता वाढून ग्रंथांची निर्मिती अधिकाधिक गतीने होईल.

सनातन आश्रमांच्या नूतनीकरणाशी संबंधित बांधकामाच्या सेवांसाठी पुढील ‘सेफ्टी इक्विपमेन्ट्स’ देऊन राष्ट्र-धर्म यांच्या कार्यात हातभार लावावा !

‘राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध राहून प्रभावीपणे कार्य करणारी सनातन संस्था ही एकमेव संघटना आहे. विविध ठिकाणी सनातन संस्थेचे आश्रम आणि सेवाकेंद्रे आहेत. त्यांचे नव्याने बांधकाम, तसेच नूतनीकरण चालू आहे.

सनातन-निर्मित ‘नामजप यंत्रा’च्या निर्मितीसाठी साहाय्य करून धर्मकार्यात हातभार लावावा !

‘अध्यात्मात नामजपाला अनन्यसाधारण महत्त्व असून तो साधनेचा पाया आहे. सर्वसामान्यांच्या मनावर देवतांच्या नामजपाचा संस्कार व्हावा, या उद्देशाने सनातन संंस्थेच्या वतीने ‘नामजप यंत्रा’चे उत्पादन करण्यात येत होते; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे उत्पादन बंद करावे लागले होते.

विविध परकीय भाषा अवगत असल्यास भाषांतराच्या सेवेत सहभागी व्हा !

‘सा-या विश्वात शास्त्रशुद्ध परिभाषेतील अध्यात्माचे ज्ञान पोहोचून अखिल मानवजातीला त्याचा लाभ व्हावा’, असा उदात्त हेतू ठेवून एस्.एस्.आर्.एफ्. विविध परकीय भाषांमधील ग्रंथसंपदा प्रकाशित करण्यासाठी प्रयत्नरत आहे. या अमूल्य ज्ञानाचे अन्य भाषांत भाषांतर करण्यासाठी जाणकारांची आवश्यकता आहे.

संगणकीय क्षेत्रातील साधक, तसेच वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना सेवेची अमूल्य संधी !

संकेतस्थळाच्या तांत्रिक सेवा करणे, विविध संगणकीय प्रकल्प बनवणे, ई.आर्.पी. सिस्टीमविषयीच्या तांत्रिक सेवा शिकणे आदी सेवांसाठी पूर्णवेळ अथवा काही कालावधीसाठी रामनाथी आश्रमात राहून वा घरबसल्या सेवा करू शकणा-या संगणकीय क्षेत्रातील जाणकारांची आवश्यकता आहे.

वाचक, हितचिंंतक आणि धर्मप्रेमी यांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात यथाशक्ती हातभार लावण्याची अमूल्य संधी !

धर्मप्रसाराच्या अंतर्गत विविध कार्यक्रमांसाठीही प्रोजेक्टरचा वापर केला जात आहे. त्यामुळे सध्या त्यांची उपलब्ध संख्या अपुरी पडत असून प्रोजेक्टर आणि त्याचा पडदा (स्क्रीन) यांचीही आवश्यकता आहे.