रोहिंग्यांची हकालपट्टी करा ! – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती

 वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

वर्धा, १३ ऑक्टोबर (वार्ता.) – म्यानमार येथून विस्थापित झालेले रोहिंग्या मुसलमानांनी भारतात सर्वत्र घुसखोरी केली आहे. त्यांच्या घुसखोरीमुळे आर्थिक, तसेच सुरक्षेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे या घुसखोरांना भारत शरण देऊ शकत नाही, अशी भूमिका सरकारने न्यायालयात मांडली आहे. रोहिंग्यांना भारतात स्थान देऊ नये आणि त्यांची हकालपट्टी करावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने विकास भवनासमोर ११ ऑक्टोबरला धरणे आंदोलन घेण्यात आले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. पद्माकर नानोटी आणि योग वेदान्त समितीचे श्री. गुप्ता उपस्थित होते. धरणे आंदोलन झाल्यावर अपर जिल्हाधिकारी श्री. संजय दैने यांना निवेदन देण्यात आले. त्यांनीही निवेदन त्वरित पुढे पाठवण्याचे आश्‍वासन दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment