जोशपूर्ण घोषणांनी हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून दुमदुमली सांगली नगरी !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले विराजमान झालेल्या चैतन्यमय रथाचा दिंडीत सहभाग !

हिंदू एकता दिंडी, सांगली

सांगली – श्री गणेशाच्या पावन नगरी सांगलीमध्ये सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने २५ मे या दिवशी हिंदू एकता दिंडीमध्ये सहभागी १ सहस्र २०० हिंदूंनी जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् यासारख्या अनेक जोशपूर्ण घोषणा देऊन हिंदु राष्ट्राचा हुंकार दिला. या दिंडीत विविध संघटना, संप्रदाय, धर्मप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिंडीमध्ये पू. दीपक (नाना) केळकर, पू. ईश्वरबूवा रामदासी आणि सनातनचे संत पू. राजाराम नरूटे या संतांची वंदनीय उपस्थिती होती.

Leave a Comment