कळंबोली येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा

कळंबोली येथील कार्यशाळेत सनातन संस्थेचा सहभाग

कळंबोली – येथे हिंदु राष्ट्र्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी करत असलेले कार्य प्रभावीपणे आणि नियमितपणे साधना म्हणून करण्याचा निर्धार कार्यशाळेतील धर्मप्रेमींनी केला. रायगड जिल्ह्यातून २० धर्मप्रेमी कार्यशाळेत उपस्थित होते. सनातन संस्थेच्या सौ. नयना भगत यांनी, तर समितीच्या वतीने श्री. बळवंत पाठक आणि सौ. मोहिनी मांढरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

सहकार्य : कळंबोली येथील समाजसेवक श्री. माणिकराव पवार आणि शाळेचे संस्थापक, तसेच नगरसेवक श्री. सतीश पाटील यांनी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले. श्रीकृष्ण मिठाई दुकानाचे मालक श्री. प्रकाश चौधरी आणि सवीन केटरर्स यांनी चहाची व्यवस्था केली होती.

 

Leave a Comment