धर्मनिरपेक्ष शब्दाची व्याख्या भारतीय राज्यघटनेत नाही ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – आज भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष या शब्दाद्वारे राज्यव्यवस्थेतील लोक हिंदूंना दाबण्याचे काम करत आहेत. प्रसारमाध्यमांतील स्वयंघोषित बुद्धीवादी हिंदूंवर वैचारिक अन्याय करत आहेत. वास्तविक घटनेत धर्मनिरपेक्ष शब्दाची व्याख्या अथवा अर्थ देण्यात आलेला नसल्याने त्याचे धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, लौकिकवाद आदी विविध अर्थ काढले जात आले आहेत. भारतीय राज्यघटनेतून हा अर्थहीन शब्द काढून टाकावा आणि सनातन धर्माधिष्ठित हा शब्द जोडावा, अशी मागणी हिंदूंनी केली पाहिजे. सरकारनेच घटनेच्या कलम ३६८ चा वापर करून भारताला हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा घटनात्मक मार्ग मोकळा करावा, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते मुझफ्फरनगर येथे धर्मनिरपेक्षतावाद आणि त्याची हानी या विषयावर बोलत होते.

श्री. राजहंस पुढे म्हणाले, धर्मनिरपेक्ष हा ख्रिस्ती विचार आहे. भारतात तो अनावश्यक आहे. वर्ष १९७६ मध्ये आणीबाणीच्या वेळी विरोधी पक्षांच्या नेत्यांना कारागृहात डांबून काँग्रेसने ४२ वी घटनादुरुस्ती करून राज्यघटनेच्या प्रास्ताविकामध्ये धर्मनिरपेक्ष शब्द घातला होता. त्याचप्रमाणे संसदीय अधिकारांचा वापर करून तो काढता येऊ शकतो. ही वस्तूस्थिती देशातील तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना सांगण्याची आवश्यकता आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रा.स्व. संघाचे श्री. रवींद्र गौड, प्रमुख पाहुणे डॉ. एम्.के. तनेजा होते. तसेच सूत्रसंचालन बन्सल कोचिंग क्लासेसच्या संचालिका डॉ. प्रीती चौधरी यांनी केले.

भगवंती सरस्वती विद्या मंदिरामध्ये कन्या शीलरक्षण विषयावर मार्गदर्शन

भारतीय समाज मुलींच्या शीलरक्षणाविषयी सतर्क असल्याचे समजला जातो. आज भारतीय संस्कृतीचे ज्ञान शिक्षणाद्वारे न दिल्यामुळे शिक्षण घेणार्‍या मुलींना शीलरक्षणाविषयी जागृत करावे लागते. संस्कारांच्या न्यूनतेमुळे याविषयावर जागृती करावी लागते आहे. संस्कारांच्या अभावामुळे शाळा आणि महाविद्यालय येथे शिकणार्‍या हिंदु मुली लव्ह जिहादमध्ये बळी पडत आहेत. या आतंकवादापासून मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी सावधान रहाण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन श्री. चेतन राजहंस यांनी येथील भगवंती सरस्वती विद्या मंदिरामध्ये कन्या शीलरक्षण या विषयावर केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment