दत्त जयंती (Datta Jayanti 2023)

दत्तजयंती का साजऱी केली जाते ?

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. 

दत्त जयंतीचे महत्त्व

दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा आणि नामजप केल्यास दत्त-तत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते.

दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत

दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. भजन, पूजन आणि विशेषकरून कीर्तन वगैरे भक्तीचे प्रकार प्रचारात आहेत. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. तामिळनाडूमध्येही दत्त जयंतीची प्रथा आहे. दत्त जयंती या दिवशी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो.

दत्त जयंती अशी साजरी करा !

👉🏻 दत्ताचा नामजप आणि प्रार्थना अधिकाधिक करा.

👉🏻 दत्ताची भावपूर्ण पूजा आणि आरती करा.

👉🏻 सायंकाळी दत्त स्तोत्राचे पठण करा.

👉🏻 दत्त तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणाऱ्या रांगोळ्या काढा.

👉🏻 घरात दत्ताची सात्त्विक नामजप पट्टी लावा.

दत्ताचा नामजप आणि आरती

श्री दत्त ही पूर्वजांना पुढील गती देणारी देवता आहे. त्यामुळे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप नियमित केल्यास पूर्वजांच्या त्रासांपासून त्रासांपासून आपले रक्षण होते. यासाठी नामजपाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप कसा करावा, हे समजून घेऊया.

 

दत्ताचा नामजप

श्री गुरुदेव दत्त

दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा

अक्षर सात्त्विक असल्यास त्यात चैतन्य असते. सात्त्विक अक्षरे आणि त्यांच्या भोवतालची देवतेच्या तत्त्वाला अनुरूप अशी चौकट यांचा अभ्यास करून सनातनने श्री गुरुदेव दत्ताची नामजप पट्टी बनवली आहे. ही नामजप पट्टी घरात लावल्याने घरात सात्विकता निर्माण होते आणि आपल्याला नामजप करण्याची आठवणही होते.

दत्ताचा नामजप केल्यावर आलेल्या अनुभूती

अशा अनुभूती भगवंताची उपासना आणि नामजप केल्यावर येतात. दत्ताची उपासना कशी करावी, साधना कशी करावी, यांविषयी जाणून घ्यायचे असल्यास आम्हाला संपर्क करा !

दत्ताला करावयाच्या काही प्रार्थना

✔ हे दत्तात्रेया, तू जसे चोवीस गुणगुरु केलेस, तसे सर्वांमधील चांगले गुण घेण्याची वृत्ती माझ्यातही निर्माण होऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना.
✔ हे दत्तात्रेया, भुवलोकात अडकलेल्या माझ्या अतृप्त पूर्वजांना पुढची गती दे.
✔ हे दत्तात्रेया, अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून तू माझे रक्षण कर. तुझे संरक्षक-कवच माझ्याभोवती सदोदित असू दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना.

दत्त जयंती उत्सव भावपूर्ण होण्यासाठी हे करा !

✔ स्त्रियांनी नऊवारी साडी अन् पुरुषांनी सदरा-धोतर/पायजमा अशी सात्त्विक वस्त्रे परिधान करून उत्सवात सहभागी व्हावे.
✔ विद्यार्थ्यांसाठी ‘श्रीदत्तात्रेयकवच’ पठण ठेवावे, दत्ताचा नामजप करवून घ्यावा.
✔ उत्सवाच्या ठिकाणी कर्णकर्कश संगीत लावणे, विद्युत रोषणाईचा झगमगाट यांसारख्या रज-तम निर्माण करणार्‍या कृती करू नयेत.
✔ दत्त जयंतीच्या मिरवणुकीत टाळ, मृदुंग अशी सात्त्विक वाद्ये वापरावीत.

दत्त तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणाऱ्या रांगोळ्या

दत्त जन्माचा इतिहास

अत्रीऋषींची पत्नी अनसूया ही पतीव्रता होती. पातिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की, इंद्रादी देव घाबरले आणि ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांकडे जाऊन म्हणाले, ‘‘तिच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल; म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करा, नाहीतर आम्ही तिची सेवा करू.’’ हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले, ‘‘एवढी काय मोठी पतीव्रता, सती आहे, ते आपण पाहू.’’

एकदा अत्रीऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनसूयेकडे त्यांनी भिक्षा मागितली. त्यावर अनसूयेने सांगितले, ‘‘ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत. ते येईपर्यंत थांबा.’’ तेव्हा त्रिमूर्ती अनसूयेला म्हणाले, ‘‘ऋषींना परत यायला वेळ लागेल. आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच अन्न द्या, नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ. `आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता’, असे आम्ही ऐकले आहे; म्हणून इच्छाभोजन करण्यास आम्ही आलो आहोत.’’ मग अनसूयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ते जेवायला बसले. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, ‘‘तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की, तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस.’’ त्यावर ‘अतिथीला विन्मुख पाठवणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळ आहे, मग कामदेवाची काय बिशाद आहे ? माझ्या पतीचे तपफळ मला तारील’, असा विचार करून ती अतिथींना म्हणाली, ‘‘मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढीन. तुम्ही आनंदाने भोजन करा.’’ मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला की, ‘अतिथी माझी मुले आहेत’ आणि विवस्त्र होऊन वाढायला आली. पहाते तो अतिथींच्या जागी रडणारी तीन लहानबाळे ! त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करवले आणि बाळांचे रडणे थांबले. इतक्यात अत्रीऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. ती म्हणाली, ‘‘स्वामिन् देवेन दत्तं ।’’ याचा अर्थ असा आहे – ‘हे स्वामी, देवाने दिलेली (मुले).’ यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण ‘दत्त’ असे केले. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णु आणि महेश त्यांच्यासमोर उभे राहिले आणि प्रसन्न होऊन ‘वर मागा’, असे म्हणाले. अत्री आणि अनसूयेने ‘बालके आमच्या घरी रहावी’, असा वर मागितला. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णुकार्यासाठी भूतलावर राहिला.

२. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत अनिष्ट शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या अनिष्ट शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस दत्तजयंती म्हणून साजरा करतात.

दत्त विषयी माहिती जाणून घ्या

संबंधित व्हिडीओ (6 Videos)

दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेचे कार्य (प्रवचन आणि ग्रंथ प्रदर्शन)

दत्त संबंधित सनातन-निर्मित उत्पादने

दत्ताच्या नामजपातून निर्माण होणार्‍या शक्‍तीने नामजप करणार्‍याच्या भोवती संरक्षक-कवच निर्माण होते. दत्ताच्या नामजपामुळे मृत्युलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळते. ( भूलोक आणि भुवर्लोक यांच्या मध्ये मृत्युलोक आहे.) त्यामुळे पुढे ते त्यांच्या कर्मानुसार पुढच्या पुढच्या लोकात गेल्याने साहजिकच त्यांच्यापासून व्यक्‍तीला होणार्‍या त्रासाचे प्रमाण कमी होते. याची अनुभूती अनेक साधकांनी घेतली आहे, तुम्ही पण घ्या !

दत्त मंदिरे