९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनात सनातन संस्‍थेच्‍या ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

वर्धा, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – येथे ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन आयोजित करण्‍यात आले होते. या ठिकाणी ग्रंथ किंवा पुस्‍तके यांच्‍या विक्रीसाठी विशेष दालन उभारण्‍यात आले होते. या दालनामध्‍ये सनातन संस्‍थेच्‍या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने यांचे प्रदर्शन लावण्‍यात आले होते. या प्रदर्शनामध्‍ये शास्‍त्रोक्‍त भाषेत लिहिलेले अध्‍यात्‍म, राष्‍ट्र आणि धर्म, आयुर्वेद, धर्माचरण इत्‍यादी विषयांवरील ग्रंथ ठेवण्‍यात आले होते. तसेच मराठी भाषेवरील अद्वितीय ग्रंथही या प्रदर्शनात उपलब्‍ध होते. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला.

Leave a Comment