।। आज योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा शताब्दी जन्मोत्सव ।।

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या १०० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त १८ मे या दिवशी येथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे येथे दिंडी

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेली दिंडी अत्यंत चैतन्यमय वातावरणात पार पडली.

‘श्रीसत्यनारायण’रूपातील गुरुदर्शनाची पर्वणी लाभलेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७७ वा जन्मोत्सव सोहळा !

पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून महर्षि मयन यांनी केलेल्या आज्ञेनुसार परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सनातनच्या साधकांना ‘सत्यनारायण’ स्वरूपात दर्शन दिले.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीला लक्षकुंकूमार्चन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पू. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून मयन महर्षि यांनी केलेल्या आज्ञेने श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीला लक्षकुंकूमार्चन करण्यात आले.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात लक्षकुंकूमार्चन विधीअंतर्गत श्री ललितात्रिपूरसुंदरी देवीचे पूजन संपन्न !

श्री महालक्ष्मीदेवीची कृपादृष्टी लाभून लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी ८ मे या दिवशी लक्षकुंकूमार्चना अंतर्गत स्फटिकाच्या श्रीयंत्रावर श्री ललितात्रिपूरसुंदरी देवीचे आवाहन करून पूजन करण्यात आले.

साधनेची तीव्र तळमळ असणार्‍या आणि प्रतिकूल परिस्थितीत श्रद्धा ढळू न देणार्‍या सोलापूर येथील श्रीमती इंदिरा नगरकरआजी संतपदी विराजमान !

६ मे या दिवशी सोलापूर येथील सुशील रसिक सभागृहात झालेल्या भावसोहळ्यात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी नगरकरआजी संत झाल्याची आनंदवार्ता दिली.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात श्री सत्यनारायण पूजा !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, सनातनच्या साधकांचे रक्षण व्हावे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत’, असा संकल्प सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केला.

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात ‘महाराजमातंगी याग’ !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात धार्मिक विधींना ५ मे या दिवशी सौरयागाने आरंभ झाला.