श्राद्ध

shraddha_2
श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्याला वेदकाळाचा आधार आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी; म्हणून श्राद्ध करणे हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्णपक्षात महालय श्राद्ध केले जाते. श्राद्ध म्हणजे काय आणि त्याविषयीचा इतिहास, श्राद्ध करण्याचे महत्त्व, पद्धत, तसेच श्राद्धपक्ष हा शुभकार्यासाठी निषिद्ध का मानला जातो, यामागील कारणे, तसेच श्राद्धविधी करण्यामागील उद्देश आपण जाणून घेऊया.

‘देवकार्यापेक्षा पितृकार्य श्रेष्ठ कसे’, श्राद्ध हे धर्म, अर्थ आणि काम यांची प्राप्ती कशी करून देते ?, श्राद्धामुळे पूर्वजांच्या त्रासांपासून आपले रक्षण कसे होते इत्यादी सूत्रांमागील अध्यात्मशास्त्रीय विवेचन या लेखात पाहू. या सर्व सूत्रांतून आपल्याला हिंदु धर्माचे महत्त्वही लक्षात येईल.

Datta_jap_640
Shraddha_Shop_320

हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता स्पष्ट करणारे शासनाचे ऑनलाईन श्राद्ध !

‘अलीकडेच एका हिंदी मासिकात बातमी होती की, शासनाने हिंदूंसाठी ‘ऑनलाईन’ श्राद्धाची सोय केली आहे. ती वाचून ‘हसू का रडू’, अशी माझी स्थिती झाली. शासनाला श्राद्ध प्रत्यक्ष करण्याची कृती आहे, हे समजत कसे नाही, याचे आश्‍चर्य वाटले. ‘ऑनलाईन’ जेवण, विवाह होत नाहीत, तर श्राद्ध कसे होईल ? कहर म्हणजे ही सोय करणारे म्हणे हिंदुत्ववाद्यांचे सरकार आहे ! हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले. श्राद्धाचे निमित्त करून हिंदूंकडून कोट्यवधी रुपये जमवण्यासाठी तर हे हिंदुप्रेम जागृत झाले नाही ना, अशी शंकेची पालही मनात चुकचुकली.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.२.२०११)

श्राद्ध

हिंदु धर्मातील श्राद्धाचे महत्त्व आणि श्राद्धाचे प्रकार

हिंदु धर्मात श्राद्धाचे महत्त्व काय ?
श्राद्धाचे विविध प्रकार जाणून घ्या !
यू.टी.एस्. या द्वारे संशोधन
श्री गुरुदेव दत्त माहिती अवश्य वाचा

This section is also available in : HindiEnglish

व्हिडीआे (Video) पहा !