सनातन संस्था आणि हिदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगली येथील पू. पारसनाथजी महाराज आणि श्री त्रिशुलभारतीगुरुजीवनभारती महाराज यांची सदिच्छा भेट

सांगली बत्तीस शिराळा येथील श्री गोरक्षनाथ मंदिराचे मठाधिपती पू. पारसनाथजी महाराज, तसेच वाळवा तालुक्यातील मौजे जक्राईवाडी येथील श्री त्रिशुलभारती गुरु जीवनभारती महाराज यांची सनातन संस्थेचे साधक श्री. शंकर नरुटे आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. भरत जैन यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

सनातन संस्था करत असलेली जागृती सर्वांमध्ये होवो ! – प.पू. स्वामिनी मंगलानंदा, अकोला

सनातन संस्था करत असलेली जागृती सर्वांमध्ये होवो. या कार्याच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक पैलूंनुसार हिंदू जोडले जावोत, असे शुभाशीर्वाद प.पू. स्वामिनी मंगलानंदा यांनी दिले.

प.पू. दास महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प पूर्णत्वाला जाण्यासाठी केलेली प्रार्थना !

प.पू. भक्तराज महाराज, आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे, ‘साधकांना चैतन्यशक्ती आणि बळ द्या. हिंदूंना संघटित होण्याची बुद्धी प्रदान करा अन् तुमचा आशीर्वाद लवकरात लवकर फळाला येऊन हिंदु राष्ट्राची पहाट उजाडू द्या.’– प.पू. दास महाराज, पानवळ, बांदा, जि. सिंधुदुर्ग.

चोपडा (जळगाव) येथील संत बालयोगीजी महाराज यांच्या हस्ते सनातन पंचांग – २०१८ चे अनावरण

संत बालयोगीजी महाराज यांच्या शुभहस्ते सनातन पंचांग – २०१८ आणि सात्त्विक आकाशकंदिल यांचे अनावरण करण्यात आले.सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी त्यांचे दर्शन घेतले.

प्रत्येकाने शुद्ध धर्माचरण केल्यास विश्‍व राममय होईल ! – प.पू. श्रीराम महाराज

प्रत्येकाने आद्य कर्तव्य म्हणून सनातन धर्माचे रक्षण केले पाहिजे. प्रत्येकाने मनापासून शुद्ध धर्माचरण साधना म्हणून केले, तर संपूर्ण विश्‍व राममय होऊन जाईल, असे प्रतिपादन प.पू. श्रीराम महाराज रामदासी यांनी केले.

मंगळुरू जिल्ह्यातील एक योगमार्गी संत प.पू. देवबाबा !

प.पू. देवबाबांचे गोमातांवर जिवापाड प्रेम आहे. त्या त्यांना जीव कि प्राण आहेत. गायीसुद्धा प.पू. देवबाबांशी बोलतात. प.पू. देवबाबा आश्रमात आल्यावर सर्व गायींजवळ जाऊन प्रेमाने त्यांच्याशी बोलतात.

सनातन संस्था मूलभूत धर्माचे तत्त्वज्ञान सांगून धर्माचा प्रसार करत आहे ! – भीष्माचार्य ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते

येथे ८ मार्च या दिवशी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी येथील वारकरी संप्रदायचे वक्ते भीष्माचार्य ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाठवलेला प्रसाद देण्यात आला.

परात्पर गुरु डॉ. आठवले हे ईश्‍वराचा अवतार ! – श्री श्री महाबलेश्‍वर स्वामी, श्री चामुंडेश्‍वरी क्षेत्र, बंटवाळ (कर्नाटक)

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे ईश्‍वराचा अवतारच आहेत अन्यथा अशी अद्भुत संस्था स्थापन करणे शक्यच नाही’, असे गौरवोद्गार बंटवाळ तालुक्यातील येथील श्री चामुंडेश्‍वरी क्षेत्राचे श्री श्री महाबलेश्‍वर स्वामी यांनी काढले.

पुणे येथील थोर संत प.पू. आबा आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांच्याकडून हिंदु राष्ट्राची स्थापना आणि परात्पर गुरु डॉ. आठवले, सनातनचे संत अन् साधक यांच्यासाठी शिवयागात पूर्णाहुती !

येथील थोर शिवभक्त आणि संत प.पू. आबा उपाध्ये अन् त्यांच्या धर्मपत्नी पू. (सौ.) मंगला उपाध्ये हे नेहमी सनातन संस्था अन् हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी आशीर्वादाच्या रूपाने आध्यात्मिक ऊर्जा पुरवतात.

सनातन संस्थेला माझा सदैव पाठिंबा ! – स्वामी श्री इंद्रदेवेश्‍वरानंद सरस्वती

सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे. या कार्याला माझे सदैव आशीर्वाद आहेत. सनातन संस्थेला माझा नेहमी पाठिंबा आहे, असे आशीर्वचन युगप्रवर्तक क्रांतीकारी राष्ट्रीय संत यज्ञपिठाधीश्‍वर धर्मसम्राट विद्यावाचस्पती महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ महंत स्वामी श्री इंद्रदेवेश्‍वरानंद सरस्वती महाराज यांनी दिले.