वैज्ञानिक परिभाषेत अध्यात्मप्रसार करून आदर्श समाजच्या निर्मितीसाठी गुरुकृपायोगानुसार साधना शिकवणारी सनातन संस्था !

१. स्थापना

आंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सनातन संस्थेची स्थापना सन १९९९ (२२.३.१९९९) मध्ये केली.

२. श्रद्धास्थाने

आंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे मानसोपचारतज्ञ आणि संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे ‘सनातन संस्थे’चे प्रेरणास्थान आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सद्‍गुरु इंदूरनिवासी संत प.पू. भक्‍तराज महाराज हे संस्थेचे श्रद्धास्थान आहेत. हिंदु धर्मातील सर्व देवता, धर्मग्रंथ, तीर्थस्थळे, संप्रदाय आणि संतमहंत यांच्याविषयी ‘सनातन संस्था’ पूज्यभाव बाळगते.

अधिक माहिती वाचा…

३. उद्देश

अ. जिज्ञासूंना अध्यात्माची शास्त्रीय भाषेत ओळख करून देणे आणि धर्मशिक्षण देणे.

आ. साधकांना वैयक्‍तिक साधनेविषयी मार्गदर्शन करून ईश्‍वरप्राप्तीपर्यंतची वाट दाखवणे.

इ. आध्यात्मिक संशोधन करणे आणि त्यातील निष्कर्षाद्वारे अध्यात्माचे महत्त्व सिद्ध करणे.

ई. अध्यात्मातील तात्त्विक (थेअरी) आणि प्रायोगिक भाग (प्रॅक्टिकल) शिकवणे.

उ. समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांद्वारे सर्वचदृष्ट्या आदर्श असलेले धर्माधिष्ठित हिंदुराष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे.

४. वैशिष्ट्ये

१. विविध पंथियांना त्यांच्या पंथाप्रमाणे मार्गदर्शन !

२. संकुचित सांप्रदायिकता नव्हे, तर हिंदु धर्मातील व्यापक दृष्टीकोनानुसार शिकवण !

३. ‘व्यक्‍ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ या तत्त्वानुसार प्रत्येकाला आवश्यकता आणि क्षमता यांनुसार साधनाविषयक दिशादर्शन !

४. शीघ्र ईश्‍वरप्राप्तीसाठी सर्व योगमार्गांना सामावून घेणार्‍या ‘गुरुकृपायोग’ या योगमार्गानुसार साधना !

५. वैयक्‍तिक साधनेबरोबरच समाजाच्या उन्नतीसाठी करायच्या साधनेची शिकवण !

अधिक माहिती वाचा…

सनातन संस्थेची तसेच Sanatan.org या संकेतस्थळाची वैशिष्ट्ये

संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ज्ञानाचे केलेले वर्गीकरण

अ. अध्यात्म जाणून घ्या !

यातील लेख प्रामुख्याने अध्यात्माची तात्त्विक माहिती देणारे आहेत, उदा. अध्यात्माचे महत्त्व, साधनामार्ग, सोळा संस्कार, जिवाची ईश्वरावरील श्रद्धा वाढवणारे शास्त्र – अनुभूती इत्यादी.

आ. अध्यात्म कृतीत आणा !

अध्यात्माच्या प्रायोगिक स्तरावरील लेखांचा यात अंतर्भाव करण्यात आला असून धर्मशिक्षण, सण, व्रते, उत्सव, काळानुसार योग्य साधनेचे महत्त्व, आध्यात्मिक त्रास आणि त्यांवरील उपाय, वास्तूशुद्धी, वाहनशुद्धी या विषयांवरील लेख ठेवण्यात आले आहेत. हिंदु धर्मातील प्रमुख सर्व सणांवरील लेखमालिका यात आहेत, उदा. गुढीपाडवा, श्रीरामनवमी, गणेशचतुर्थी, नवरात्र, दिवाळी, मकरसंक्रांत, महाशिवरात्र इत्यादी. साधनेच्या अनुषंगाने गुरुकृपायोगातील अष्टांगसाधनेतील प्रत्येक टप्प्याविषयीचे लेख (नाम, सत्संग, सेवा, त्याग) यात आहेत.

इ. विश्वव्यापी सनातन (हिंदु) धर्म

या वैशिष्ट्यपूर्ण विषयांतर्गत हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदू राष्ट्र, कुंभमेळा, हिंदु देवता यांविषयीचे लेख ठेवण्यात आले आहेत. ‘माय मराठी’च्या रक्षणासाठी प्रत्येकाने तळमळीने प्रयत्न करणे, ही काळाची आवश्यकता ओळखून मातृभाषा आणि सात्त्विक मराठी भाषेचे रक्षण अन् संवर्धन यांसाठी ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त नुकतीच एक वैशिष्ट्यपूर्ण लेखमालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ई. सनातनचे अद्वितीयत्व

या भागाच्या अंतर्गत आध्यात्मिक संशोधन, ईश्वरप्राप्तीसाठी विविध कला, गुरुकृपायोगानुसार साधना करुन झालेले संत या विषयांवरील वैशिष्ट्यपूर्ण लेखांद्वारे सूक्ष्मातील अलौकिक ज्ञान विश्वाला देण्यात आले आहे.

उ. अपसमज आणि त्यांचे खंडण

या सदरात धर्मद्रोह्यांकडून समाजात पसरवले जाणारे अध्यात्म, देवता, धर्म, धर्मग्रंथ, प्रथा परंपरा इ. विषयींच्या अपसमजांचे खंडन करण्यात आले आहे.

ऊ. आध्यात्मिक उपाय

जीवनातील ८० टक्के दुःखांमागे आध्यात्मिक कारण असते, असे अध्यात्मशास्त्र सांगते. त्यामुळे कित्येक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरील दुःखांवर आध्यात्मिक स्तरावर उपचार करणे आवश्यक असते. त्यासाठी आध्यात्मिक स्वरूपाचे त्रास कसे असतात आणि त्यावर काय उपाय योजावेत, यांची माहिती देणारा विभाग !

ए. विविध उपचार पद्धती (आपत्काळासाठी संजीवनी)

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या सदरात सांगितलेल्या उपायपद्धती केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे. या लेखातून वाचकांना या उपायपद्धतीची ओळख होईल.

ऐ. अध्यात्मविषयी शंकानिरसन

अध्यात्मातील सैद्धांतिक भागाचा कितीही अभ्यास केला, तरी मनातील शंकांचे निरसन झाल्याविना साधना नीट होत नाही. या दृष्टीने जगभरातील जिज्ञासू आणि साधक यांच्या मनात अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक अन् प्रायोगिक भागांविषयी सर्वसाधारणपणे उद्भवणार्‍या (आत्मा, मुक्ती, मोक्ष, वेद, देवता, प्रारब्ध आदी) शंकांचे निरसन या सदरातून होईल. त्याचप्रमाणे स्त्रियांनी गुरुचरित्र किंवा गायत्री मंत्र का म्हणू नये, कर्मकांडातील नियम, तसेच धर्मभ्रष्टांच्या शुद्धीकरणासंबंधी हिंदु धर्मशास्त्र काय सांगते ? आदींचे शास्त्रीय विवेचनही येथे केले आहे.

ओ. श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)

श्राव्य दालनामध्ये (ऑडियो गॅलरीमध्ये) ‘विविध देवतांचे नामजप’, ‘देवतांच्या आरत्या’ ठेवल्या आहेत. तसेच सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रेही संकेतस्थळावरून संरक्षित (download) करण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.

औ. सूक्ष्म-जगताशी संबंधित अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण विभाग

सूक्ष्म म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील विश्व ! ‘अथर्ववेदा’तही सूक्ष्म-जगताशी संबंधित माहिती आहे. अनेक प्रगत राष्ट्रांतही विविध गुन्ह्यांची उकल करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला पछाडलेल्या भूताचा वापर केला जातो. आज या अज्ञात शक्तींविषयीशास्त्रशुद्ध माहिती नसल्याने अनेकजण अंधश्रद्धांना खतपाणी घालतांना दिसतात. कित्येक जण तर भोंदू मांत्रिकांच्या फसवणुकीला बळी पडत आहेत. हे टाळण्यासाठी या जगताची माहिती देणारे अनोखे विभाग या संकेतस्थळावर आहेत.

क. आध्यात्मिक संशोधन

सनातनने ‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफिक स्कॅनिंग मशिन’ (DDFAO), ‘पॉलिकॉन्ट्रास्ट इन्टरफिअरन्स फोटोग्राफी’ (PIP), ‘इलेक्ट्रोस्कॅनिंग मेथड’ (ESM) आणि ‘गॅस डिस्चार्ज व्हिज्युअलायझेशन’ (GDV) या वैज्ञानिक उपकरणांद्वारे विविध प्रकारचे सहस्त्रो प्रयोग केले आहेत. या सर्व प्रयोगांच्या संशोधनांतून जीवनात साधना करण्याचे महत्त्व, तसेच भारतीय संस्कृती, संगीत, आहार इत्यादींचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले आहे. त्याची माहिती या विभागात देण्यात आली आहे.

ख. सात्त्विक रांगोळ्या

विविध देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या सात्त्विक रांगोळ्यांच्या कलाकृती उपलब्ध !

‘ऑनलाईन’ प्रसारात वृद्धी – अन्य संकेतस्थळांद्वारे सनातनच्या संकेतस्थळाचा व्यापक प्रसार करण्यात येणे

‘सनातन संस्थे’च्या ‘फेसबूक’वरील पृष्ठालाही वाढता प्रतिसाद मिळत असून पृष्ठाची (पेजची) सदस्यसंख्या झपाट्याने वाढत आहे. Twitter, Pinterest आणि Instagram या संकेतस्थळांद्वारेही सनातनच्या संकेतस्थळाचा व्यापक स्तरावर प्रसार करण्यात येत आहे.

‘टेलिग्राम’वरील पृष्ठाची मार्गिका :

t.me/SSMarathi

t.me/SanatanSanstha

‘ट्विटर’वरील खात्याची मार्गिका : https://www.twitter.com/sanatansanstha

Pinterest वरील पृष्ठाची मार्गिका : https://www.pinterest.com/sanatansanstha/

Youtube : https://www.youtube.com/sanatansanstha

Apps

1. Sanatan Sanstha Android : https://www.sanatan.org/android

Sanatan Sanstha iOS : https://www.sanatan.org/ios

2. Sanatan Chaitanyavani Audio App : https://Sanatan.org/Chaitanyavani

3. Ritualistic worship (puja) and arti of Shri Ganesh Android : https://www.sanatan.org/ganeshapp

Ritualistic worship (puja) and arti of Shri Ganesh iOS : https://www.sanatan.org/iosganeshapp

4. Shraddh Rituals App Android :  https://www.sanatan.org/shraddh-app

5. Survival Guide App Android : https://www.sanatan.org/survival-guide-app

अध्यात्मशास्त्रावरील शेकडो शंकांचे निरसन करण्यात येणे

संकेतस्थळावर अध्यात्मातील विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. कुलदेवता, वाईट शक्ती, सुख-शांतीसाठी काय करावे ?, गुरु करणे, कर्मकांड, वास्तूशुद्धी, सूर्योपासना, नामजपातील अडथळे, श्राद्ध, विविध व्रते, अंत्यविधी, पूजाविधी, प्रदक्षिणा, देवघर, अग्निहोत्र, आध्यात्मिक पातळी, गुरुबंधू, पूर्वजांचा त्रास, सुतक अशा अध्यात्मातील अनेक अंगांविषयीचे जिज्ञासूंनी प्रश्न विचारले असून प्रत्येकाला त्याची उत्तरे पाठवण्यात आली आहेत. संकेतस्थळाकडे विविध ठिकाणांहून सनातन-निर्मित ग्रंथ आणि उत्पादने यांची मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे. आपणही आपल्या शंका विचारु शकता.

सनातन संस्थेचे व्यापक कार्य

‘सनातन संस्था’ ही ऋषीमुनी आणि संत-महंत यांनी धर्मशास्त्र हा आधारस्तंभ मानून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उन्नतीचा जो मार्ग दाखवला, त्यानुसार कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. ‘सनातन संस्थे’चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.
अधिक माहिती वाचा…

अभिप्राय

जिज्ञासू, मान्यवरआणि संत सनातन कार्य जाणून घेतल्यावर कार्यात सहभागी होण्याची ईच्छा व्यक्त करतात.
अधिक माहिती वाचा…

इच्छुकांनो, कार्यात सहभागी होण्यासाठी पुढील मार्गिकेवरील अर्ज भरा !

सनातन संस्थेच्या विविध विनामूल्य उपक्रमांत स्वयंसेवक, प्रायोजक किंवा अन्य हेतूने सहभागी होऊन धर्म आणि राष्ट्र यांच्याप्रती असलेले आपले कर्तव्य बजावण्यास इच्छुक असणार्‍यांसाठी पुढील मार्गिकेवर कार्यात सहभागी होण्याचा अर्ज ठेवण्यात आला आहे :

www.sanatan.org/sampark