अशून्यशयन व्रत

‘आषाढ कृष्ण (वद्य) पक्ष द्वितीया या दिवशी ‘अशून्यशयन व्रत’ केले जाते. या वर्षी ही तिथी १८.७.२०१९ या दिवशी आहे. हे व्रत आषाढ मासापासून मार्गशीर्ष मासापर्यंत प्रत्येक मासातील वद्य द्वितीयेस करावे.

वात्सल्यभावाने साधकांना मार्गदर्शन करणार्‍या आणि त्यांना भावसागरात डुंबवणार्‍या पू. (सौ.) संगीता जाधव !

‘पू. काकूंनी (पू. (सौ.) संगीता जाधव यांनी) त्यांच्या नावाप्रमाणे आम्हाला प्रेमळ आणि मधुर स्वरात साधनेसंदर्भात सतत मार्गदर्शन करून आम्हा साधकांच्या जीवनात संगीतमय वातावरण निर्माण केले आहे.

देवद येथील सनातन आश्रमातील श्री. शिवाजी वटकर १०२ व्या समष्टी संतपदी विराजमान !

देवद येथील सनातन आश्रमात सेवा करणारे, तसेच तळमळ, चिकाटी, नम्रता इत्यादी दैवी गुणांद्वारे संतांचे मन जिंकणारे, तीव्र प्रारब्धावर मात करून व्यष्टी आणि समष्टी साधना करणारे, राष्ट्र अन् धर्म यांच्या प्रेमापोटी अविरतपणे कार्यरत रहाणारे श्री. शिवाजी वटकर (वय ७२ वर्षे) हे सनातनच्या १०२ व्या समष्टी संतपदी विराजमान झाले.

संतांप्रती भाव असलेले आणि संतत्वाचे मोल खर्‍या अर्थाने जाणलेले परात्पर गुरु डॉ. आठवले !

शिष्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचा संग्रह करून त्यावर आध्यात्मिक संशोधन करणारे परात्पर गुरु डॉक्टर एकमेव आहेत.

भावभक्तीची अनुभूती देणारी पंढरपूरची वारी !

वैयक्तिक जीवनातील अभिनिवेष बाजूला ठेवून ईश्‍वराच्या नामस्मरणात देहभान विसरायला लावणारा आध्यात्मिक सोहळा म्हणजे पंढरपूरची वारी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा साधनेचा विहंगम मार्ग दाखवला ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रसारक, सनातन संस्था

भारताला प्राचीन काळापासून गुरुपरंपरा लाभली आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा साधनेचा विहंगम मार्ग दाखवला.

महर्षींच्या आज्ञेने सनातनच्या गुरुपरंपरेचे पूजन करून भावपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात व्यक्त केली कृतज्ञता !

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांच्या सहभागाने या वर्षी एकूण ११० गुरुपौर्णिमा महोत्सव देशभरात साजरे करण्यात आले.

गुरुपौर्णिमेनिमित्त परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा संदेश (२०१९)

गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! गुरुपौर्णिमेला गुरूंप्रती एक दिवसाची कृतज्ञता व्यक्त करण्यापेक्षा गुरूंना अपेक्षित असलेले कार्य वर्षभर आणि सातत्याने करत रहाणे, हीच खरी कृतज्ञता ठरते.

ग्रहणकालात असणार्‍या संधीकालातील गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यास त्रास न होता लाभच होईल !

गुरुपौर्णिमेच्या रात्री ग्रहण असणे, म्हणजे संधीकालात असणारी गुरुपौर्णिमा होय. या दिवशी गुरूंना केली जाणारी प्रार्थना, कृतज्ञता, सेवा, दान, श्रवण, चिंतन यांचा अनंत पटींनी लाभ होणार आहे.

भारतात दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण, त्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि राशीपरत्वे मिळणारे फल !

भारतात १६.७.२०१९ (आषाढ पौर्णिमा) आणि १७.७.२०१९ या २ दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे.