हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्थेच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे २ दिवसीय हिंदूसंघटक कार्यशाळेचे आयोजन

हिंदूसंघटक कार्यशाळेत व्यासपिठावर उपस्थित डावीकडून श्री. गुरुप्रसाद (मार्गदर्शन करतांना), सद्गुरु सत्यवान कदम, श्री. काशीनाथ प्रभु आणि श्री. रमानंद गौडा

मंगळुरू (कर्नाटक) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ९ आणि १० ऑगस्ट या दिवशी येथील सनातनच्या सेवाकेंद्रात धर्मप्रेमींसाठी दोन दिवसीय हिंदूसंघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मंगळुरू, पुत्तुर, सुळ्या आणि उजिरे या तालुक्यांतील २३ धर्मप्रेमी सहभागी झाले होते. या कार्यशाळेला सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या कार्यशाळेला सनातनचे कर्नाटक राज्य धर्मप्रसारक श्री. रमानंद गौडा आणि श्री. काशिनाथ प्रभु, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद अन् श्री. मोहन गौडा यांनी धर्मप्रेमींना संबोधित केले.

या कार्यशाळेत साधनेचे महत्त्व, हिंदु राष्ट्राची मूळ संकल्पना, संघटन करतांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निमूर्र्लनाचे महत्त्व, आध्यात्मिक उपाय करण्याचे महत्त्व, कौशल्य विकास कसा करायचा आणि परिणामकारक धर्मप्रसार करण्यासाठी वैयक्तिक संपर्क कसे करायचे, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

धर्मप्रेमींचे मनोगत

१. श्री. जयराज सालियान, उजिरे :  स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे केवळ हिंदु राष्ट्र्र-स्थापनेसाठी नाही, तर व्यावहारिक जीवनातही आनंद मिळण्यासाठी आवश्यक आहे. मोठ्या विश्‍वविद्यालयांतही असे शिक्षण मिळत नाही, तसे शिक्षण आम्हाला या २ दिवसांच्या कार्यशाळेत मिळाले.

२. श्री. दिनेश एम्. पी., मंगळुरू : दोष आणि अहं यांमुळे १८ वर्षांमध्ये माझी व्यावहारिक आणि कौटुंबिक जीवनात मोठी हानी झाली आहे. आतापर्यंत माझ्याकडे मनुष्यत्व नव्हते, असे वाटत आहे. आजपासून मी प्रामाणिकपणाने जीवनात ध्येय ठेऊन प्रयत्न करणार आहे.

३. अधिवक्ता उदय कुमार बी. के. : साधकांची प्रीती, विनम्रता, आत्मीयता, साधक आणि धर्मप्रेमींची कौटुंबिक भावना पाहून आपणही तसे बनावे, असे वाटत आहे.

४. श्री. मंजुनाथ गौडा : मंगळुरु सेवाकेंद्राचे व्यवस्थापन, स्वच्छता, साधकांचा प्रेमभाव हे आतापर्यंत कोठेच पाहिले नव्हते. हे सर्व शिकवणारी सनातन संस्था ही एकमेव संस्था आहे.

क्षणचित्रे

१. धर्मप्रेमींनी स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन या विषयांसंदर्भात जिज्ञासेने जाणून घेतले.

२. सर्वांनी या कार्यशाळेतून प्रेरणा घेऊन आणि ध्येय घेऊन १५ नवीन धर्मशिक्षणवर्ग, १५ ठिकाणी धर्मजागृती सभा अन् २ नवीन ठिकाणी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्याचा निश्‍चय केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment