सत्कार कसा करावा ?

शास्त्रशुद्ध पद्धतीने सत्कार करतांना लक्षात घ्यावयाची सूत्रे !

 

१. कुंकू लावणे

‘सर्वप्रथम उजव्या हाताच्या मध्यमेने सत्कारमूर्तींना गंध किंवा कुंकू लावावे. कुंकू ओले करून लावू शकतो. संतांना अनामिकेने कुंकू लावावे.

 

२. शाल किंवा धोतर-उपरणे अर्पण करणे

शाल देणार असल्यास त्यांना कुंकू लावल्यानंतर शाल अर्पण करतांना ती त्यांच्या अंगावर पांघरावी.

 

३. हार घालणे

सत्कार करण्यापूर्वी हाराची उंची सत्कारमूर्तींच्या मापाचीच असल्याची निश्‍चिती करावी आणि नंतर त्यांना हार घालावा. पुरोहितांनी पौरोहित्यामध्ये एखादी विशेष पदवी, उदा. घनपाठी, न्यायचूडामणी, मीमांसक प्राप्त केली असल्यासच त्यांना हार घालावा.

 

४. औक्षण करणे (निरांजनाने ओवाळणे)

सत्कारमूर्तींचे औक्षण करावे. संतांना तुपाच्या निरांजनाने तीन वेळा ओवाळावे. पुरोहित ज्ञानी आणि वयोवृद्ध असल्यास त्यांना तेलाच्या निरांजनाने तीन वेळा ओवाळावे. (औक्षण करण्यापूर्वी औक्षणाच्या ताम्हणात मध्यभागी तेलाचे निरांजन (संतांसाठी तुपाचे निरांजन), निरांजनाच्या बाजूला, म्हणजेच आपल्या डाव्या हाताला थोड्या अक्षता ठेवून एक सुपारी ठेवावी. निरांजनाला गंध आणि फूल वाहावे. ताम्हणात उजव्या हाताला आपल्याजवळ हळद आणि तिच्यापुढे कुंकू ठेवावे.)

 

५. भेटवस्तू देणे

त्यानंतर खाऊ, ध्वनीचित्र-चकती, ग्रंथ इत्यादी भेटवस्तू देऊ शकतो. त्यावर नारळ ठेवावा. नारळाला कुंकू लावलेले असावे. नारळाची शेंडी घेणार्‍यांच्या दिशेने येईल, असे पहावे.

 

६. नमस्कार करणे

संत, तसेच इतर सत्कारमूर्ती वयाने ज्येष्ठ असल्यास त्यांना वाकून नमस्कार करावा.

 

पुरुष आणि स्त्री सत्कारमूर्तींचा सत्कार करण्याचा क्रम

सत्का-राच्या

कृती

पुरुष स्त्री
संत महिला हिंदुत्ववादी आणि कार्यकर्त्या
संत, गुरुवर्य अाणि पुरोहित हिंदुत्ववादी अाणि समाजातील व्यक्ती अविवाहित कन्या/स्त्री साैभाग्यवती विधवा अविवाहित कन्या/स्त्री साैभाग्यवती विधवा
१. कुंकू लावणे हो हो हो (टीप १) हो (टीप १) हो हो
२. शाल किंवा धोतर-उपरणे अर्पण करणे हो (टीप २) हो (टीप २)
(टीप ३)
हो हो हो
३. हार घालणे हो हो हो हो
४. औक्षण करणे (निरांजनाने ओवाळणे) हो हो हो हो (टीप ४)
५. आेटी भरणे हो हो
६. भेटवस्तू देणे हो हो हो हो हो हो (टीप ५) हो (टीप ५) हो (टीप ५)
७. नमस्कार करणे हो हो हो हो हो हो हो हो

 

टीप १ : हळद-कुंकू
टीप २ : शाल किंवा धोतर-उपरणे
टीप ३ : सत्कारमूर्तींच्या मानानुसार शाल किंवा अन्य वस्त्र देणे अथवा न देणे ठरवावे.
टीप ४ : सत्कारमूर्ती विधवा असल्या, तरी त्यांनी संतप्रद प्राप्त केले असल्याने आपण संतरूपी ईश्‍वरालाच ओवाळत आहोत, असा भाव ठेवून ओवाळावे.
टीप ५ : शाल/वस्त्र दिले नसल्यास भेटवस्तूसमवेत नारळ द्यावा. नारळाला कुंकू लावलेले असावे. नारळाची शेंडी घेणार्‍याच्या दिशेने येईल, असे पहावे.

– वेदमूर्ती केतन शहाणे, अध्यापक, सनातन साधक-पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१०.२०१४)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment