मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. सध्या मकर संक्रांतीचा दिवस १४ जानेवारी हा आहे. सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी क्वचित प्रसंगी संक्रांत एक दिवसाने पुढे ढकलली जाते म्हणजे १५ जानेवारीला असते. २०२३ मध्ये मकर संक्रांत १५ जानेवारीला आहे. हिंदु धर्मात संक्रांतीला देवता मानले आहे. संक्रांतीने संकरासुर दैत्याचा वध केला, अशी कथा आहे. संक्रांतीच्या दुसर्या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले.
हा प्राकृतिक उत्सव आहे, म्हणजे प्रकृतीशी ताळमेळ साधणारा उत्सव. दक्षिण भारतात हे पर्व ‘थई पोंगल’ नावाने ओळखले जाते. सिंधी लोक या पर्वाला ‘तिरमौरी’ म्हणतात. महाराष्ट्रात तसेच हिंदी भाषिक ‘मकर संक्रांत’ म्हणतात आणि गुजरातमध्ये हे पर्व ‘उत्तरायण’ नावाने ओळखले जाते.
मकर संक्रांतीचे महत्त्व
या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते. या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वातावरण अधिक चैतन्यमय असल्याने साधना करणाऱ्याला या चैतन्याचा लाभ होतो. कर्क संक्रांती पासून मकर संक्रांती पर्यंतच्या काळाला ‘दक्षिणायन’ म्हणतात. दक्षिणायनापेक्षा उत्तरायणात मरण येणे अधिक चांगले समजले जाते.
‘संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो; कारण या काळात ब्रह्मांडात आप, तसेच तेज या तत्त्वांशी संबंधित कार्य करणार्या ईश्वरी क्रियालहरींचे प्रमाण अधिक असते.’ – सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (२२.२.२००५, रात्री)
मकर संक्रांतीच्या पर्वकाळात दान द्या !

मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या वेळी केलेली पुण्य कर्मे विशेष फलद्रूप होतात. धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप, धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभरपटीने प्राप्त होते. सनातन संस्थेच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्यार्थ धनरूपात दान द्या –
दानात कोणत्या वस्तू द्याव्यात ?
‘नवे भांडे, वस्त्र, अन्न, तीळ, तीळपात्र, गूळ, गाय, घोडा, सोने किंवा भूमी यांचे यथाशक्ती दान द्यावे. या दिवशी सुवासिनी दान देतात. काही पदार्थ सुवासिनी कुमारिकांकडून लुटतात आणि त्यांना तीळगूळ देतात.’ सुवासिनी हळदी – कुंकवाचा कार्यक्रम करून जे देतात, त्याला ‘वाण देणे’ असे म्हणतात.
वाण देणे
असात्त्विक वाण दिल्याने होणारे तोटे दर्शवणारे सूक्ष्म-चित्र
प्लास्टिक-वस्तू, स्टीलची भांडी आदी असात्त्विक वाण दिल्यामुळे वाण घेणाऱ्या अन् देणाऱ्या अशा दोन्ही व्यक्तींमध्ये देवाण-घेवाण संबंध (हिशोब) निर्माण होतो.
सात्त्विक वाण दिल्याने होणारे लाभ दर्शवणारे सूक्ष्म-चित्र
सात्त्विक वाण दिल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊन दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळते. सात्त्विक वाण देणे, हा धर्मप्रसारच असून त्यामुळे ईश्वरीकृपा होते.
आजकाल अधार्मिक वस्तूंचे वाण देण्याची चुकीची प्रथा पडली आहे. या वस्तूंपेक्षा सौभाग्याच्या वस्तू, उदबत्ती, उटणे, धार्मिक ग्रंथ, पोथ्या, देवतांची चित्रे, अध्यात्मविषयक ध्वनीचित्र-चकत्या इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूंचे वाण द्यावे.
वाणात सात्त्विक वस्तू देण्यासाठी पहा
SanatanShop.com
मकर संक्रांतीच्या काळात तीर्थस्नान केल्याने महापुण्य मिळणे
तीळगुळाचे महत्त्व
तिळाचे वैशिष्ट्य दर्शवणारे सूक्ष्म-चित्र
हळदी-कुंकू करण्याचे महत्त्व
हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गा देवीचे अप्रकट तत्त्व जागृत होते अन् श्रद्धापूर्वक हळद-कुंकू लावणाऱ्या जिवासाठी कार्य करते. हळदी-कुंकू करणे, म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे. हळदी-कुंकवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जिवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो. हळदी-कुंकू आणि वाण देणे आदी विधीतून जिवावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास, तसेच ईश्वराप्रती जिवाचा भाव वाढण्यास साहाय्य होते.
हळदी- कुंकवातील पंचोपचार
अ. हळद-कुंकू लावणे
हळद-कुंकू लावणे, म्हणजे दुसऱ्या जिवातील श्री दुर्गा देवीची अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तीभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे.
आ. अत्तर लावणे
अत्तरातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधकणांमुळे देवतेचे तत्त्व प्रसन्न होऊन जिवासाठी अल्प कालावधीत कार्य करते. गंधकणांकडे देवतेचे तत्त्व आकृष्ट झाल्याने ते जिवासाठी व्यापक रूपात, म्हणजेच आवश्यक त्या उपरूपांत कार्य करते.
इ. गुलाबपाणी शिंपडणे
गुलाबपाण्यातून प्रक्षेपित होणाऱ्या आप-तत्त्वाशी संबंधित सुगंधित लहरींमुळे वायूमंडलातील देवतेच्या लहरी कार्यरत होतात आणि आपोआपच वातावरणशुद्धी होते. वातावरणातील त्रासदायक स्पंदने दूर झाल्यामुळे कार्यरत झालेल्या देवतेच्या सगुण तत्त्वाचा लाभ अधिक मिळतो.
ई. ओटी भरणे
ओटी भरणे, म्हणजे श्री दुर्गा देवीच्या इच्छाशक्तीला आवाहन करणे. श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती तिच्या ओटीपोटात संपुटित आहे. ओटी भरणे म्हणजे तिच्यातील इच्छाशक्तीला आवाहन करून शरण जाणे. श्रद्धेने ओटी भरल्याने जिवाची इच्छा पूर्ण होते. देवतेच्या कार्यरत इच्छाशक्तीतून देवतेची कृपा लवकर संपादन करता येते. ओटी भरणे, म्हणजेच श्री दुर्गा देवीची निर्मितीची किंवा कार्य करण्याची इच्छा प्रबळ करणे.
उ. वाण देणे
वाण देतांना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात. वाण देणे, म्हणजे दुसऱ्या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे. पदराच्या टोकाचा आधार देणे, म्हणजे अंगावरील वस्त्राच्या आसक्तीचाही त्याग करणे. या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते, म्हणजेच दान सत्कारणी लागते.
मकर संक्रांती निमित्तचे हळदी-कुंकू रथसप्तमी पर्यंतच का करावे ?
रथसप्तमी पर्यंतचा काळ हा तेजाला पुष्टी देणारा असल्याने या काळापर्यंत हळदीकुंकू केले जाते. त्यानंतर हळूहळू तेजाचे प्राबल्य न्यून होऊ लागते, त्यामुळे विधीतून मिळणाऱ्या पुण्यदर्शक फलप्राप्तीचे प्रमाणही न्यून होते.
सुगड मधील घटक कोणते ?
बोरन्हाण कसे करावे ?
मकर संक्रातीच्या दिवशी काळी वस्त्रे परिधान करू नयेत !
शरशय्येवर ५८ दिवस प्राण धरून रहाणारे भीष्माचार्य
महादेवाला तीळ-तांदूळ अर्पण करणे
प्रकाशमय कालावधी
जीवनाकडे साक्षीभावाने पहाण्यास शिकवणारा सूर्याचा उत्सव
सूर्य देवाने तहानलेल्या अश्वांना पाणी पाजलेल्या मडक्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण
मकर संक्रांतीची माहिती देणारे व्हिडिओ पहा !
सण-उत्सव आणि साधना यांविषयी जाणून घेण्यासाठी ऑनलाईन सत्संगात सहभागी व्हा !
साधना संवाद या ऑनलाईन सत्संगात सण-उत्सव आणि साधना यांविषयी माहिती दिली जाते. हे आनंदी जीवनाचे प्रवेशद्वारच आहे. आनंदी जीवन कसे जगावे आणि आध्यात्मिक प्रगती कशी करावी हे जाणून घेण्यासाठी या सत्संगात सहभागी व्हा.