आपल्या आध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा !

‘ज्याच्यापासून आपली निर्मिती झाली, त्याचा शोध घ्यावा, त्याच्याकडे जावे, असे प्रत्येकालाच वाटते. एखाद्याला मोठेपणी कळले की, तो समजतो ती त्याची खरी आई नसून जन्मदात्री आई दुसरीच आहे आणि ती अमुक एका ठिकाणी आहे, तर तो तिचा शोध घेऊन तिला भेटेल. सुट्टीत आपण कोणत्याही प्रेक्षणीय स्थळी गेलो, अगदी परदेशात गेलो, तरी परत घरी येण्याची ओढ आपल्याला असते. तसेच ज्या परमेश्वरापासून आपली निर्मिती झाली, त्याचा शोध घ्यावा, त्याच्याकडे जावे, असे प्रत्येकालाच सूक्ष्म रूपाने तरी वाटत असतेच. त्यामुळे प्रत्येकाला आध्यात्माची ओढ असतेच.

सर्वसाधारण व्यक्‍तीच्या जीवनात २० टक्के समस्या शारीरिक आणि / किंवा मानसिक कारणांमुळे निर्माण होतात, ३० टक्के समस्या शारीरिक आणि / किंवा मानसिक, तसेच आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण होतात आणि उरलेल्या ५० टक्के समस्या निवळ आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण होतात. म्हणजेच जीवनातील ८० टक्के समस्या साधनेमुळे सुटतात किंवा त्या सहन करण्याची (प्रारब्ध भोगण्याची) शक्‍ती साधनेमुळे मिळते.

यासाठी आपल्या आध्यात्मिक प्रवासाला आत्तापासूनच आरंभ करा !

  • नामजप : कलियुगातील श्रेष्ठ उपासना !
  • नामजप कोठे करावा ?
  • नामजप कोणता करावा ?
  • नामजप अधिक चांगला होण्यासाठी साहाय्यभूत असलेली ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ !
  • अहं : ईश्‍वरप्राप्तीतील अडथळा !
  • कोणत्या मार्गाने साधना करावी ?

सनातन संस्थेच्या ‘साधना संवाद’साठी आताच नोंदणी करा !

नामजप : कलियुगातील श्रेष्ठ उपासना !

‘यज्ञानां जपयज्ञोस्मि ।’ अर्थात ‘कलियुगात सर्व यज्ञात ‘मी’ जपयज्ञात आहे.’ भगवान श्रीकृष्णाने महाभारतात सांगितलेले हे वचन नामाचे महत्त्व स्पष्ट करते. केवळ नामानेच ‘वाल्ह्या’चा ‘वाल्मिकी होऊ शकतो, यांतच नामाचे विशेषत्व, सर्वश्रेष्ठत्व सिद्ध होते. ईश्वराच्या नामाचे विशेष महत्त्व जाणून घेऊन वाचकांनी योग्य नामसाधनेला आरंभ करावा, हीच भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

नामजप कोठे करावा ?

‘सर्वकाही ईश्‍वरानेच निर्माण केलेले असल्याने कोठेही, कधीही त्याचे नाव घ्यावे. एकाच ठिकाणी बसून नामजप करण्यापेक्षा व्यवहारातील सर्व कामे करत असतांना नामजप करणे, ही श्रेष्ठ प्रतीची साधना आहे; कारण त्यात एकतर साधना अखंड चालू रहाते आणि दुसरे म्हणजे व्यक्ती व्यवहारातील कामे करत असतांना, नामजपामुळे मायेत असूनही नसल्यासारखी असते. अशा सर्व स्थितींत भगवंताशी अनुसंधान साधणे, यालाच ‘सहजस्थिती’ किंवा ‘सहजावस्था’ असे म्हणतात.

नामजप कोणता करावा ?

अ. गुरूंनी दिलेले नाम

‘आपल्या प्रगतीसाठी कोणते नाम घ्यावे’, हे आपल्याला कळत नाही; गुरुच सांगू शकतात. त्यासाठी त्यांनी एखादा नामजप करण्यास सांगितला असल्यास तो करावा. गुरूंनी दिलेले नाम घेतांना अहंभाव नसतो. स्वतःच्या आवडत्या देवाचे नाव घेतांना थोडातरी अहंभाव असतो.

आ. कुलदेवता

नाम देणारे कोणी योग्य गुरु न भेटल्यास आपल्या कुलदेवतेचा, म्हणजे कुलदेवीचा किंवा कुलदेवाचा जप करावा.

कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असल्यास कोणता नामजप करावा ?

  • लहानपणी आई-वडील असतांना आपण आईकडेच अधिक हट्ट करतो; कारण ती हट्ट लवकर पुरवते. तसेच कुलदेवापेक्षा कुलदेवी लवकर प्रसन्न होते.
  • कुलदेवापेक्षा कुलदेवी ही पृथ्वीतत्त्वाशी अधिक संबंधित आहे. तिच्यापासून साधनेला आरंभ केला की कुठलाही त्रास होत नाही.
  • ज्यांना केवळ कुलदेव आहे, त्यांनी त्याचा जप करावा, उदा. श्री व्यंकटेश कुलदेव असेल, तर ‘श्री व्यंकटेशाय नमः’ जप करावा.
  • परात्पर गुरूंनी दिलेला नामजप आध्यात्मिक उन्नतीसाठी १०० टक्के, कुलदेवीचा ३० टक्के, तर कुलदेवाचा २५ टक्के पूरक असतो.

अधिक माहिती वाचा @ कुलदेवतेचा नामजप का आणि कसा करावा ?

इ. अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी श्री गुरुदेव दत्ताचा नामजप करा !

हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी कुटुंबातील मृत व्यक्तीचे श्राद्ध-पक्ष करत नाही, तसेच साधनाही करीत नसल्याने बहुतेक सर्वांनाच पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होतो. पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे किंवा त्रास होत आहे, हे उन्नतच सांगू शकतात.

अधिक माहिती वाचा @ श्री गुरुदेव दत्ताचा नामजप का आणि कसा करावा ?

नामजपाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !

नामजप अधिक चांगला होण्यासाठी साहाय्यभूत असलेली ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ !

साधारणपणे आपल्या प्रत्येकातच राग, चिडचिडेपणा, आळस, विसराळूपणा इत्यादी स्वभावदोष अल्प-अधिक प्रमाणात असतात. स्वभावदोष असलेली व्यक्‍ती ईश्‍वराशी कधीही एकरूप होऊ शकत नाही. स्वभावदोषांमुळे साधनेत हानीही होते. स्वभावदोष असण्याचा आणखी एक तोटा म्हणजे स्वभावदोषांचा फायदा उठवून आसुरी शक्‍तींना त्रास देणे सोपे होते. यासाठी साधकानेच नव्हे, तर प्रत्येकानेच स्वभावदोष दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्‍न करणे आवश्यक असते.

नामजप अधिक चांगला होण्यातील मुख्य अडथळा म्हणजे व्यक्‍तीतील स्वभावदोष !

समजा, एखाद्याचा स्वभाव अतिशय रागीट आहे आणि लहान लहान गोष्टींवरूनही तो दुसर्‍यांवर रागावत असतो. त्यामुळे त्याची मनःस्थिती बिघडल्याने त्याला मनाची एकाग्रता साधता येत नाही आणि त्याच्या हातून चुका होऊन त्याची कार्यक्षमता घटते. तसेच रागावण्यामुळे साधकाला साधनेतून मिळणारे समाधान टिकवता येत नाही. असा मनुष्य जेव्हा इतरांशी रागावून बोलतो, तेव्हा इतरांना वाईट वाटते किंवा ते दुःखी होतात. याची परिणती इतरांचीही मनःस्थिती बिघडण्यात होते. पुढे इतरांना त्याच्याशी बोलतांना एकप्रकारचा ताण जाणवतो, म्हणजेच इतरांना त्याच्याशी सुसंवाद साधता येत नाही.

अहं : ईश्‍वरप्राप्तीतील अडथळा !

व्यक्‍तीमध्ये अहंचा थोडा जरी अंश असला, तर तिला ईश्‍वरप्राप्ती होणार नाही. यासाठी साधना करत असतांना अहं-निर्मूलनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्‍न करणे आवश्यक असते. प्रार्थना, कृतज्ञता, शारीरिक सेवा यांसारख्या कृतींनी अहं अल्प होण्यास मदत होते.

अधिक माहिती वाचा…

कोणत्या मार्गाने साधना करावी ?

साधना करतांना गुरुकृपेशिवाय सर्व काही व्यर्थ आहे ! गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, यालाच ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात. ‘गुरुकृपायोग’ या योगाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तीयोग अशा सर्व साधनामार्गांना सामावून घेणारा, असा हा ईश्वरप्राप्तीचा सहजसुलभ मार्ग आहे.

गुरुकृपायोगानुसार करावयाच्या साधनेचा एकच सिद्धांत आहे आणि तो म्हणजे ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’. पृथ्वीवरची  लोकसंख्या सातशे कोटीहून अधिक आहे; म्हणून ईश्वरप्राप्तीचे सातशे कोटीहून अधिक मार्ग आहेत. या संख्येतील कोणतीही दोन माणसे एकसारखी नसतात. प्रत्येकाचे शरीर, मन, आवडी-निवडी, गुणदोष, आशाआकांक्षा, वासना निराळ्या असतात. प्रत्येकाची बुद्धी निराळी असते, संचित, प्रारब्ध निराळे असते; प्रत्येकातील पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही तत्त्वे (मनुष्य या पंचतत्त्वांपासून बनला आहे.) अन् सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण यांचे प्रमाण निरनिराळे असते. थोडक्यात प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकृतीचा आणि पात्रतेचा असल्याने ईश्वरप्राप्तीचे साधनामार्गही अनेक आहेत. आपली प्रकृती आणि पात्रता यांना अनुरूप अशी साधना केल्यास ईश्वरप्राप्ती लवकर होण्यास साहाय्य होते. सनातन संस्थेचे सहस्त्रो (हजारो) साधक गुरुकृपायोगाच्या एकाच छत्राखाली आपापली निरनिराळी साधना करत आहेत.

अधिक माहिती वाचा…

ऑनलाइन ‘साधना संवाद’


ऑनलाइन ‘साधना संवाद’ हे सत्र आपल्या जीवनाला आनंदी बनवण्याचे आध्यात्मिक द्वार आहे. आध्यात्मिक प्रगती करून जीवनात आनंद प्राप्त करण्यासाठी या सत्संगामध्ये अवश्य सहभागी होऊया. ‘साधना संवाद’मध्ये सहभागी होऊन आमच्या ‘साधना सत्संगा’मध्ये सहभागी होण्यासाठी कृपया खाली नोंदणी करा !

‘साधना संवाद’मध्ये आपण साधना करताना येणारे अनुभव-अनुभूती मोकळेपणे सांगू शकता. या अनुभवांचे या संवादामध्ये आध्यात्मिक विश्लेषण केले जाईल. तसेच या संवादामध्ये आपण साधना करतांना आपल्या मनात उद्भवणारे प्रश्न आणि येणार्‍या अडचणी यांविषयीही मोकळेपणाने विचारू शकता.

हे ‘साधना संवाद’ सत्संग प्रत्येक रविवारी सोयीच्या वेळांमधे आयोजित केले जातात.

हा ‘साधना संवाद’ हा Google Meet या ॲप्लीकेशनच्या माध्यमातून असेल.

आपण ‘साधना संवाद’मध्ये सहभागी झाल्यानंतर आम्ही आपल्याला नियमित साप्ताहिक सत्संगाला जोडून देऊ, जेथे आपल्याला आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन केले जाईल. हेच सत्संग आपल्या आनंदी जीवनासाठी अधिक उपयुक्त ठरतील !

सनातनच्या ‘साधना सत्संगा’ची वैशिष्ट्ये :

  • आपल्या प्रकृतीनुसार आणि क्षमतेनुसार योग्य आणि सुलभ साधनेचे मार्गदर्शन !
  • जीवनातील आध्यात्मिक समस्यांविषयी आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात दिशादर्शन !
  • अध्यात्म आणि साधना संबंधित शंकांचे निरसन !
  • आपण सनातन संस्थेच्या सत्संगात येत असाल, तर आपल्याला ‘साधना संवाद’साठी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.

हे ‘साधना संवाद’ मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड या भाषांमध्ये आहेत. यापैकी आपणाला सोयीस्कर भाषेसाठी आपण नोंदणी करू शकता !

चला, तर मग सनातन संस्थेच्या ‘साधना संवाद’साठी आताच नोंदणी करा…

अधिक माहिती वाचा…