सरकारने चीनची आर्थिक नाकेबंदी करावी : यवतमाळ येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

यवतमाळ : कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणार्‍या भारतियांना नाथुला खिंडीतून जाण्यास चीनने प्रतिबंध घातला, तसेच सिक्किमच्या डोकलाम भागात सीमारेषा पार करून दोन भारतीय बंकर उद्ध्वस्त केली. असे असूनही सरकार चीनशी व्यापार वाढवत आहे. आज चीनी वस्तू भारतियांच्या घराघरांत पोहोचल्या आहेत. ‘यापुढे चिनी वस्तूंवर प्रतिबंध घालून, स्वदेशीचा आग्रह धरणे आवश्यक आहे. त्यासाठी भारत सरकारने चीनशी असलेल्या व्यापारविषयक धोरणांवर पुनर्विचार करून चीनची आर्थिक नाकेबंदी करावी’, अशी मागणी यवतमाळ येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली. आंदोलनात राष्ट्र-धर्मविषयक अन्य मागण्याही करण्यात आल्या.

या वेळी बजरंग दलाचे श्री. योगिन तिवारी, पतंजलि योगपिठाचे श्री. रमेश राऊत, श्री. संजय चाफले, भारत स्वाभिमान संघटनेचे श्री. दिनेश राठोड, हिंदुराज मित्र मंडळाचे श्री. प्रज्योत चौकडे, धर्माभिमानी श्री. मिलिंद ठोसर, श्री. मंगेश तायडे, सनातन संस्थेचे श्री. रमाकांत दाभाडकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश खांदेल यांसह ५० साधक, कार्यकर्ते उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. धर्माभिमानी श्री. मिलिंद ठोसर यांनी आंदोलनादरम्यान उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला.

२. आंदोलनाच्या आरंभी आणि नंतर थोडा पाऊस आला; मात्र आंदोलनादरम्यान पाऊस थांबला होता. त्यामुळे ‘आंदोलन निर्विघ्नपणे पार पडले, हा वरुणदेवतेचा आशीर्वाद मिळाला’, असे सर्वांना जाणवले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment