नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलन करतांना कार्यकर्ते

नागपूर : येथे हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांनी १८ सप्टेंबरला संविधान चौक येथे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. ‘मोहरमच्या निमित्ताने दुर्गामूर्ती विसर्जनावर बंदी आणून मुसलमानांच्या सणांच्या वेळी हिंदु सणांवर बंदी आणण्याची पद्धत हा धार्मिक पक्षपात आहे’, असे मत सनातन संस्थेच्या सौ. मंगला पागनीस यांनी मांडले. ‘लव्ह जिहाद’ या षड्यंत्राची भीषणता समजून घेऊन या समस्येवर सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी समितीच्या सौ. नम्रता शास्त्री यांनी केली.

क्षणचित्रे

१. २ वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी छायाचित्र काढले आणि चित्रीकरण केले, तसेच मुलाखतही घेतली.

२. या वेळी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. स्वाक्षरी करणार्‍या हिंदु धर्माभिमान्यांनी समितीच्या कार्याला जोडण्याची उत्सुकता दर्शवली.

३. आंदोलनाला पोलीस आणि पत्रकार यांचे उत्तम सहकार्य लाभले.

Leave a Comment