सनातन संस्थेच्या वतीने देहली येथील शाळेत ‘नैतिक शिक्षण’ विषयावर मार्गदर्शन !

सनातन संस्थेच्या वतीने देहलीच्या सैदुलाजाब येथील ‘लिटिल वंस पब्लिक स्कूल’मध्ये ‘नैतिक शिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनाचा इयत्ता ३ री ते ५ वीपर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या वेळी ‘जीवनाचा उद्देश, जीवन कसे जगावे ? जीवनात घडणा-या विविध प्रसंगांना सामोरे कसे जावे ? शिक्षणाचा उद्देश काय आहे ? विद्यार्जन म्हणजे काय ?’, इत्यादींविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

सत्कार कसा करावा ?

‘सर्वप्रथम उजव्या हाताच्या मध्यमेने सत्कारमूर्तींना गंध किंवा कुंकू लावावे. कुंकू ओले करून लावू शकतो. संतांना अनामिकेने कुंकू लावावे.

अहेर करणे

अहेर या संकल्पनेविषयी आपण जर शास्त्रीय भाषेत समजून घेतले, तर अनाठायी होणारा व्यय थांबवू शकतो.

उद्‍घाटन

समारंभ किंवा कार्य सिद्धीस जाण्यासाठी देवतेचा आशीर्वाद मिळणे आवश्यक असते. यासाठी उद्‍घाटन हे विधीवत कसे करावे ते आता पाहूया.