राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवा ! – (सदगुरु) नंदकुमार जाधव, सनातन संस्था

पाठ्यपुस्तकातून लोकमान्य टिळक यांचा अवमान केल्याचे प्रकरण

डावीकडून अधिवक्ता श्री. गोविंद तिवारी, सद्गुरु नंदकुमार जाधव, श्री. सुनील घनवट आणि श्री. विजय पाटील

जळगाव – राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या संदर्भ पुस्तकात लोकमान्य टिळक यांचा ‘आतंकवादाचे जनक’, असा अवमानकारक उल्लेख करण्यात आला आहे. हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते. त्यांचा हा अवमान आम्ही कदापि खपवून घेणार नाही. राजस्थान शासनाने या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन पुस्तकातील आक्षेपार्ह उल्लेख तात्काळ वगळावा, तसेच हा प्रकार नजरचुकीने झालेला नसून राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्यासाठी हेतूतः लोकमान्य टिळकांचा असा उल्लेख केला आहे. असा उल्लेख करणारे लेखक, ते छापणारे मुद्रक, प्रकाशक आणि संबंधित दोषी शासकीय अधिकारी यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करावी, संबंधित पुस्तक त्वरित मागे घ्यावे आणि संबंधितांनी याविषयी जाहीर क्षमायाचना करावी अन्यथा या विरोधात समिती देशभरात आंदोलन करणार, अशी चेतावणी समितीचे महाराष्ट्र्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी आणि समितीचे श्री. विजय पाटील उपस्थित होते.

भुसावळ येथे १३ मे या दिवशीच्या हिंदु धर्मजागृती सभेत यासंदर्भात निषेध करण्यात येणार असून त्या निमित्ताने स्वाक्षरी अभियानही राबवण्यात येणार आहे. सहस्रो स्वाक्षर्‍यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे, असेही श्री. घनवट यांनी सांगितले.

राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात
वैध मार्गाने आवाज उठवा ! – (सदगुरु) नंदकुमार जाधव, सनातन संस्था

लोकमान्य टिळकांना आतंकवादी ठरवणे, यामागेे मोठे षड्यंत्र आहे. राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवायला हवा.

लोकमान्य टिळकांना ‘आतंकवादाचे जनक’ संबोधणार्‍या
अधिकार्‍यांचे डोके ठिकाणावर आहे का ? – अधिवक्ता गोविंद तिवारी, प्रदेशाध्यक्ष, हिंदू महासभा

पाठ्यपुस्तकातून लोकमान्य टिळकांना ‘आतंकवादाचे जनक’ संबोधणार्‍या अधिकार्‍यांचेे डोके ठिकाणावर आहे का ? टिळक यांना ‘आतंकवादाचे जनक’ (फादर ऑफ टेररिझम) म्हणणे, हे देशद्रोही कृत्यच म्हणावे लागेल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment