सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतांना श्री. प्रसाद मानकर, समवेत धर्मप्रेमी

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तिथीनुसार असणार्‍या जयंतीनिमित्त (२१ मे) दादर येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने सावरकरांना अभिवादन करण्यात आले. या वेळी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सनातनचे साधक आणि समितीचे कार्यकर्ते यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयजयकार करून ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् ।’ ही घोषणा दिली. या वेळी समितीचे सर्वश्री प्रसाद मानकर, सतीश सोनार, सनातनच्या सौ. शर्मिला बांगर, तसेच श्री. प्रशांत लिंगायत आणि श्री. विराज दपके हे उपस्थित होते.

Leave a Comment