जळगाव येथे हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून धर्मप्रेमींचे संघटन !

धर्मध्वज पूजन करतांना सरजू दास महाराज, समवेत सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव

जळगाव – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने १९ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता शहरात ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते सनातनचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे छायाचित्र ठेवलेल्या पालखीचे पूजन करण्यात आले. शंख आणि नगारे यांच्या नादातून वातावरणात चैतन्य संचारले. विविध घोषणा देत १ सहस्र धर्मप्रेमींच्या उपस्थितीत दिंडी मार्गस्थ झाली.

Leave a Comment