मुंबई येथे ‘हिंदू एकता दिंडी’त एकवटलेल्या धर्मप्रेमींकडून हिंदु राष्ट्राचा जयघोष !

आमदार दिवाकर रावते श्रीफळ वाढवतांना

मुंबई – ‘लाना होगा, लाना होगा, हिंदु राष्ट्र लाना होगा’, ‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ अशा घोषणा देत उत्साहपूर्ण वातावरणात मुंबई येथे २१ मे या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. परात्पर गुरु डॉ. आठवले याच्या जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथील १ सहस्र ५०० हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. हिंदुत्वनिष्ठ, सामाजिक आणि संप्रदाय अशा २५ संघटनांचा सहभाग होता. शंखनाद, श्री गणेशवंदन आणि देवतांना प्रार्थना करून दादर (पश्चिम) येथून दिंडीला प्रारंभ झाला. वसई (मेधे) येथील ‘श्री परशुराम तपोवन आश्रमा’चे संचालक भार्गवश्री बी. पी. सचिनवाला यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. ‘गौंड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. प्रवीण कानविंदे यांनी धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण केला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिवाकर रावते यांनी श्रीफळ वाढवले. त्यानंतर रायगड येथील साधक दांपत्य सौ. वर्षा अन् प्रशांत लिंगायत यांनी मुंबादेवीचे पूजन केले. त्यानंतर दिंडीला प्रारंभ झाला. कबूतरखाना येथून शिवाजी पार्कपर्यंत दिंडी काढण्यात आली.

सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन पथक

या दिंडीला सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर, पू. सुदामराव शेंडे, पू. (सौ.) संगीता जाधव यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.  पालख्यांमध्ये ठेवलेले मुंबादेवी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांचे नागरिक भावपूर्ण दर्शन घेत होते.

 

हिंदु राष्ट्रासाठी हिंदूंची एकजूट हवी ! – विनोद मिश्रा, योग वेदांत सेवा समिती

संतांमुळे हिंदू जागृत होत आहेत. आम्हाला राज्य नको. आमचे संत हवे आहेत. हिंदु राष्ट्रासाठी हिंदूंची एकजूट हवी आहे.

सुवासिनी महिलांचे लेझीम पथक

 

प्रत्येक जागरूक हिंदूने हिंदु राष्ट्रासाठी १०
हिंदूंना एकत्र करावे ! – दीप्तेश पाटील, हिंदू गोवंश रक्षा समिती

देशात हिंदू बहुसंख्य आहेत; मात्र जातीपाती आणि राजकीय पक्ष यांमध्ये विभागला गेले आहेत, कुटुंबामध्ये अडकले आहेत. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी जागरूक हिंदूंनी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी १० हिंदूंना एकत्र करायला हवे.

 

दिंडीत सहभागी झालेले अन्य मान्यवर आणि विविध संघटना

आमदार कालिदास कोळंबकर यांचा सत्कार करतांना समितीचे श्री. सतीश सोनार

भाजपचे आमदार कालीदास कोळंबकर, माहिम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षा सौ. अक्षता तेंडुलकर, हिंदु राष्ट्र सेनेचे मुंबईचे अध्यक्ष श्री. प्रकाश सावंत, ‘हिंदू हेल्पलाईन’चे श्री. पारस राजपूत, भारत स्वाभिमानचे श्री. दयानंद शेडगे, योग वेदांत सेवा समितीचे श्री. ओमजी विष्णोई, गायत्री परिवाराचे मुंबईचे अध्यक्ष पी.के. शर्मा, वारकरी संप्रदायाचे (कोणगाव, रायगड) ह.भ.प. सुरेश महाराज, हिंदु महासभेचे (मुंबई) श्री. प्रवीण गर्जे आणि श्री. अशोक पवार यांसह श्री परशुराम तपोवन आश्रम, वैदिक संशोधन केंद्र, वारकरी संप्रदाय, हिंदू टास्क फोर्स (नालासोपारा), योग वेदांत सेवा समिती, हिंदु राष्ट्र सेना, पतंजली योग समिती, हिंदु जनजागृती समिती, भारत स्वाभिमान, श्री राज मरूधर जैन संघ (दादर), वामनराव पै संप्रदाय, गायत्री परिवार, माँ शक्ती सामाजिक संस्था, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ, शिवडी मार्केट गणेशोत्सव मंडळ, राष्ट्रीय बजरंग दल, अखिल भारतीय ब्राह्मण विकास परिषद, हिंद सायकल गणेशोत्सव मंडळ, भगवा गार्ड, वामनराव पै संप्रदाय, हिंदू गोवंश रक्षा समिती, गायत्री परिवार, स्वतंत्र सवर्ण सेना, हिंदू महासभा

 

दिंडीची वैशिष्ट्ये !

हिंदु जनजागृती समितीचे युवक-युवती प्रात्यक्षिके सादर करतांना

१. समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने कराटे, लाठीकाठी, दंडसाखळी आदींची प्रात्यक्षिके दिंडीमध्ये सादर केली.

२. रायगड जिल्ह्यातील कोणगाव येथील ह.भ.प. सुभाष महाराज यांसह वारकर्‍यांनी दिंडीत टाळांच्या वाद्यासह भजने म्हटली.

३. दिंडीत लहान मुले छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषेत सहभागी झाली होती. श्रीकृष्ण आणि गोपिका यांच्या वेशभूषेत तरुणीही सहभागी झाल्या होत्या.

Leave a Comment