स्वाभिमान निर्माण होण्यासाठी ‘गेट वे ऑफ इंडिया’चे नाव त्वरित बदलावे. – गिरीष जोशी, सनातन संस्था

रामनाथ (अलिबाग) येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलन

रामनाथ (अलिबाग) – आसाममध्ये बांगलादेशी घुसखोर कोण आणि मूळ आसामी नागरिक कोण, याची ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन’ची प्राथमिक सूची प्रसिद्ध झाली आणि काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी गोंधळ घालायला आरंभ केला. काश्मीरमधून विस्थापित झालेल्या साडेचार लाख हिंदूंचे गेल्या २७ वर्षांत पुनर्वसन केले नाही, याविषयी कोणीच बोलत नाही. भारतात अवैधपणे राहून सर्व सुविधा उपभोगणार्‍या बांगलादेशी घुसखोर मुसलमानांचा पुळका येणारे हे राष्ट्रनिष्ठ नाहीत, असेच म्हणावे लागेल. घुसखोरांना पोसण्यासाठी भारतीय जनता कर भरते का ? घुसखोरांपैकी अनेक जण आतंकवादी, तसेच राष्ट्रविरोधी कारवायांमध्येही गुंतले असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. घुसखोर मुसलमान ही आता राष्ट्रीय समस्या बनली आहे. त्यामुळे केवळ आसाममधील बांगलादेशी घुसखोरच नव्हे, तर संपूर्ण देशभरातील बांगलादेशी, पाकिस्तानी आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोरांनाही तात्काळ देशाबाहेर काढा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे रायगड जिल्हा समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी केली. ते १९ ऑगस्ट या दिवशी  येथील शिवाजी चौकात झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते. या वेळी २३ राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी उपस्थित होते. आंदोलनात आतंकवादविरोधी पथकाने गोरक्षक श्री. वैभव राऊत यांच्यावर कायद्याबाह्य केलेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला.

प्रदूषण एक निमित्त असून खरे लक्ष्य हिंदु धर्म आहे ! – अधिवक्ता
श्रीराम ठोसर, कुलाबा जिल्हा समरसता आयाम प्रमुख, विश्‍व हिंदू परिषद

गणेशोत्सवाच्या कालखंडात प्रदूषण पुष्कळ होते असा आव आणत, ‘विवेकवादाचा विजय असो !’, अशी घोषणा देणारे हिंदुद्रोही अविवेकाची कामे करतात. आमच्या धार्मिक परंपरांना पायदळी तुडवत कागदी लगद्यापासून गणपती बनवण्याचे आवाहन केले जाते. कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्‍या गणेशमूर्तींमुळेच प्रदूषण अधिक होते. कागदामधील शाई विरघळून जलचरांना धोका निर्माण होतो असल्याचे पर्यावरण तज्ञांनी अहवालात म्हटले आहे. आपल्या शास्त्रामध्ये परिपूर्ण विचार करून मातीपासून गणेशमूर्ती सिद्ध करावी, असे सांगितले आहे. गणेशभक्तांना मी आवाहन करतो की, मातीची मूर्ती आणा, वहात्या पाण्यात विसर्जसन करा. अधार्मिक कृत्यांना बळी न पडता आपल्या धार्मिक परंपरा जपा. पुरोगाम्यांना खरोखर काही करायचे असते असते, तर काही वेगळा पर्याय निवडला असता; परंतु प्रदूषण एक निमित्त असून खरे लक्ष्य हिंदु धर्म आहे. हिंदू संघटित होऊ नयेत, यासाठी पुरोगाम्यांचे हे षड्यंत्र आहे.

इस्लामिया प्रायमरी स्कूलचे नाव त्वरित पालटण्यात यावे ! – अरविंद भास्कर जावकर, धर्मप्रेमी

या वेळी श्री. जावकर म्हणाले, ‘‘उत्तरप्रदेशमध्ये इस्लामिया प्रायमरी स्कूल’ चालू करण्यात आले आहे, तसेच रविवार ऐवजी शुक्रवारी सुटी देण्याचा घाट घातला आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देण्यावर प्रतिबंध केला जातो आणि दुसरीकडे मात्र इस्लामिया प्रायमरी स्कूल सुरु करून इस्लामचं शिक्षण देण्यात येते. निधर्मीपणाच्या नावाखाली हे अयोग्य आहे. शासनाने अशाप्रकारे भारतात किती शाळा आहेत याची चौकशी करून त्या त्वरीत बंद कराव्यात.

स्वाभिमान निर्माण होण्यासाठी ‘गेट वे ऑफ इंडिया’चे नाव त्वरित बदलावे. – गिरीष जोशी, सनातन संस्था

गुलामगिरीचे प्रतीक असलेले ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे नाव पालटून ‘भारतव्दार’ करावे. आज अनेक देशांमध्ये पारतंत्र्याच्या खुणा पुसल्या जातात; परंतु आपल्या देशात मात्र इंग्रजाळलेले राज्यकर्ते वर्षानुवर्षे त्याच खूणा जपून ठेवतात त्यामुळे स्वत:ची अस्मिता तसेच स्वाभिमान निर्माण होण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया चे नाव त्वरित पालटावे

लवरात्री या चित्रपटाच्या नावातच नवरात्रीचे विडंबन आहे ! – सौ. वैशाली गावंड, रणरागिणी शाखा

५ ऑक्टोबरला सलमान खाननिर्मित लवरात्री चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या नावातच नवरात्रीचे विडंबन करण्यात आले आहे. १० ऑक्टोबरला नवरात्र चालू होत असून हा आम्हा हिंदूंचा पवित्र सण आहे. त्यामुळे विडंबन करणारे नाव त्वरित पालटण्यात यावे आणि यातील संवाद आणि प्रसंग हिंदुविरोधी आहेत का, हे पाहून त्यावर बंदी घालावी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment