चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला ! – श्रीमती (डॉ.) मृणालिनी भोसले, सनातन संस्था

बळवंतराव मराठे शाळेत विद्यार्थ्यांसमोर विषय मांडतांना डॉ. मृणालिनी भोसले

मिरज – भारतीय सीमेत घुसखोरी करून सतत भारताला पाण्यात पहाणार्‍या चीनला अद्दल घडवण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक आणि संघटना यांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याच्या संदर्भात आंदोलने, तसेच सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून मोहिमा चालू केल्या आहेत. याला समाजातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून राष्ट्रहिताची भावना निर्माण होत आहे. या आंदोलनात विद्यार्थ्यांनीही सहभागी होऊन चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून इतरांनाही तसे करण्यास प्रवृत्त केले पाहिजे, असे आवाहन सनातन संस्थेच्या श्रीमती (डॉ.) मृणालिनी भोसले यांनी केले. येथील बळवंतराव मराठे शाळेत १२ ऑगस्ट या दिवशी ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. याचा लाभ ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला. शाळाप्रमुख श्री. शिंदेगुरुजी यांनी आभार मानले. सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी या विषयाच्या निवेदनावर स्वाक्षरी केली.

 

Leave a Comment