आध्यात्मिक उपाय
वाईट शक्तींच्या त्रासामुळे सनातनला अन् संपूर्ण मानवजातीला झालेला महत्त्वपूर्ण लाभ ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘सनातनचे समष्टी स्तरावरील कार्य चालू झाल्यावर वाईट शक्तींनी त्याला विरोध म्हणून विविध स्तरांवर आणि विविध माध्यमांतून त्रास देण्यास आरंभ केला. या त्रासांमुळे सनातनला अनेक संतांकडून वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणासाठी करावयाचे विविध उपाय शिकणे शक्य होत आहे. त्रासाच्या निवारणासाठी विविध उपचारपद्धती शोधून काढता आल्या आणि काळानुसार सनातनला त्यांवरही विपुल प्रमाणात संशोधन करता आले. सध्याच्या काळात महर्षींच्या माध्यमातूनही विविध उपचारपद्धती कळत आहेत. साधकांना काही वर्षे हे त्रास सहन करावे लागले असले, तरी त्यातून पुढील अनेक पिढ्यांसाठी या उपायपद्धती सिद्ध झाल्या आहेत.’
सध्याच्या कलियुगात एकंदरित समाज धर्माचरणापासून विन्मुख झाल्याने आसुरी शक्तींनी उच्छाद मांडला आहे. आपण भौतिक साधनांनी वा अन्य मार्गांनी आनंदी व्हायचा प्रयत्न केला, तरी आसुरी शक्तींच्या त्रासांमुळे आनंदी होऊ शकत नाही. मग हा त्रास दूर होण्यासाठी नियमित कोणते नामजप आदी आध्यात्मिक उपाय आणि साधना करावी ? अतृप्त पूर्वजांमुळे होणार्या बुद्धीअगम्य त्रासांसंबंधी काय करावे ?, तसेच वास्तूदोष दूर होण्यासाठी अत्यल्प खर्चात वास्तूशुद्धी आणि प्रवास आनंददायी होण्यासाठी वाहनशुद्धी कशी करावी ? यांसारख्या सूत्रांचे विवेचन या सदरात केले आहे.
काळानुसार कोणते नामजप किती वेळ करावेत ?
‘आता तिसर्या महायुद्धाचा काळ जवळ येणार असल्याने त्यामध्ये आपले रक्षण व्हावे आणि पुढे ‘रामराज्याची स्थापना व्हावी’, यांसाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा जप कमीतकमी १० माळा आणि जास्तीतजास्त जमेल तितका करावा.
आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी देवाने सुचवलेला नामजप !

























































