संभाजीनगर येथे १५ ऑगस्टनिमित्त जिल्हाधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना सनातन संस्थेच्या वतीने निवेदन

संभाजीनगर : येथील जिल्हाधिकारी श्री. नवल राम यांना १५ ऑगस्टनिमित्त निवेदन देण्यात आले. या वेळी अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, तसेच धर्मप्रेमी, शिवसेना महिला आघाडीच्या सौ. कविता सुरळे, भाजपचे युवा शाखेचे श्री. अजिंक्य देशपांडे, अधिवक्ता जी.टी. लांडगे, अधिवक्ता एस्.पी. शेळके, सनातन प्रभातचे वाचक श्री. रामचंद्र पाल, धर्मप्रेमी श्री. प्रकाश सोनवणे, सनातन संस्थेचे साधक, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कु. प्रतीक्षा कोरगांवकर उपस्थित होत्या. निवेदनानंतर कक्षात उपस्थित असलेले उपजिल्हाधिकारी श्री. विश्‍वंभर गावंडे यांनी पुन्हा या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावले. संभाजीनगरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment