गुढीपाडवा
गुढीपाडवा साजरा केल्याने चैतन्यनिर्मिती होऊन ईश्वराकडे जाण्यास साहाय्य होते. या दृष्टीने साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व; १ जानेवारीपेक्षा गुढीपाडव्याला वर्षारंभ करणे; युद्ध आणि गुढी यांचा संबंध; गुढीपाडव्याची पूर्वसिद्धता अन् त्यासंबंधी घ्यावयाची काळजी; गुढीसाठी तांब्याचा तांब्या, कडूनिंब, ओला बांबू आदी वापरण्यामागील शास्त्र; ब्रह्मध्वज (गुढी) पूजाविधी, गुढीला करायची प्रार्थना, वर्षफल ऐकणे आदी कृतींचे शास्त्रीय विवेचन या सदरात केले आहे. तसेच यासंबंधी प्रत्यक्ष कृतींचे चलच्चित्रपटही (व्हिडीओ) येथे उपलब्ध आहेत.
कृपया गुढीपाडवा साजरा करतांना शासनाने लावलेल्या सर्व निर्बंधाचे पालन करावे !
सध्याच्या आपत्काळात गुढीपाडवा असा साजरा करा ! –
सध्या अनेक ठिकाणी संचारबंदी लागू केली आहे. अशा वेळी पारंपरिक पद्धतीने गुढी उभी करण्यासाठी साहित्य मिळाले नाही; म्हणून नवर्षाचा आध्यात्मिक लाभ घेण्यापासून वंचित राहू नका ! गुढीपाडवा पुढील पद्धतीने साजरा करा -*
1. नवीन बांबू उपलब्ध नसल्यास जुना बांबू स्वच्छ करून वापरावा. तेही शक्य नसल्यास अन्य कोणतीही काठी गोमूत्राने वा विभूतीच्या पाण्याने शुद्धी करून वापरू शकतो.
2. कडुनिंब वा आंब्याची पाने उपलब्ध नसल्यास ती वापरू नयेत.
3. अक्षता या सर्वसमावेशक असल्याने नारळ, विड्याची पाने, सुपारी, फळे हे उपलब्ध न झाल्यास पूजेतील त्या उपचाराच्या वेळी अक्षता वाहू शकतो. फुलेही उपलब्ध न झाल्यास अक्षता वाहिल्या तरी चालतील.
4. कडुनिंबाच्या पानाचा नैवेद्य करणे शक्य न झाल्यास गोड पदार्थाचा अन् गोड पदार्थ उपलब्ध न झाल्यास गूळ वा साखर यांचा नैवेद्य दाखवावा.
नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
संबंधित व्हिडीओ