सनातन संस्थेतर्फे राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठीं यवतमाळ येथे पोलीस उपअधीक्षकांना निवेदन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम !

पोलीस उपअधीक्षक नरुल हसन (उजवीकडे) यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

यवतमाळ – शासनाचा अध्यादेश डावलून आणि अनुमती नसतांना प्लास्टिकचे ध्वज विकणारे विक्रेते, तसेच सामान्य व्यक्ती, संस्था, समूह यांपैकी जे कोणी ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा मान राखणार नाहीत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, या मागणीचे निवेदन ३० जुलैला पोलीस उपअधीक्षक नरुल हसन यांना देण्यात आले. या वेळी राष्ट्रध्वजाची विटंबना करणार्‍यांवर कठोर कारवाई करू,असे आश्‍वासन त्यांनी दिले. निवेदन देतांना सनातन संस्थेचे श्री. पांडुरंग पिल्लेवार आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय फोकमारे उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment