सनातन प्रभातविषयी आध्यात्मिक स्तरावर आलेल्या अनुभूती प्रकाशित झाल्यावर थयथयाट करून दैनिकावर कारवाई करण्याची भाषा करणारे ‘मॅक्स महाराष्ट्र’ !

‘मॅक्स महाराष्ट्र’ या ब्लॉगवर (http://maxmaharashtra.com/6075 वर) २५ ऑगस्टच्या दैनिक सनातन प्रभातच्या अंकातील पृष्ठ ७ वर ‘दैनिक सनातन प्रभातने देहावरील आवरण काढल्याने झालेले लाभ’ या मथळ्याखालील लेखाच्या संदर्भात टीका करण्यात आली आहे.

एका इस्लामी देशात कट्टरवादी संघटनांनी पाठवलेले सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर धादांत खोटे दोषारोप करणारे पत्र

एस्.एस्.आर्.एफ्. ही आध्यात्मिक संशोधन करणारी संस्था आहे. अनेक देशांतील जिज्ञासू एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ वाचून त्यांच्या अध्यात्मविषयक शंकांचे निरसन करून घेत आहेत. एका इस्लामी देशातील काही जिज्ञासूंनीही एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनाखाली साधना आरंभली आहे.

सनातन संस्था, सनातन प्रभात आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यावर गरळओक करणा-या हिंदुद्वेष्ट्यांचा सनातनचे प्रवक्ता अभय वर्तक यांच्याकडून सडेतोड प्रतिवाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते बॉम्बस्फोट आणि भ्रष्टाचार यांमध्ये सापडले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष ‘आतंकवादी’ ठरतो का ?

इतर पंथांतील मार्गदर्शक, संत, तत्त्वज्ञ, भविष्यवेत्ता, शास्त्रज्ञ आणि समाजसुधारक यांना झालेला विरोध आणि सनातनला होणारा विरोध !

ज्याप्रमाणे वरील थोर व्यक्तींना विरोध होऊनही ते ध्येयापासून विचलित झाले नाहीत, त्याचप्रमाणे सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि तिच्याशी संलग्न संघटना या हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापनेसाठी सदैव कार्यरत रहातील.

सनातन संस्थेने राबवलेल्या ‘प्रगत स्वसंरक्षण प्रशिक्षण’ उपक्रमाचा अन्वेषण यंत्रणांनी केलेला विपर्यास आणि वास्तव !

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणांच्या निमित्ताने अन्वेषण यंत्रणांनी सनातनच्या साधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे.

विपर्यस्त वृत्ते प्रसारित करून सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची खालच्या थराला जाऊन अपकीर्ती करणारी सनातनद्वेष्टी प्रसारमाध्यमे !

कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या संदर्भात कोल्हापूरच्या विशेष चौकशी पथकाच्या अधिकार्‍यांनी गोव्यात सनातनच्या आश्रमात येऊन साधकांची चौकशी केली. यामुळे नेहमी सनातनची अपकीर्ती करण्यासाठी हपापलेल्या प्रसारमाध्यमांना आयते कोलित मिळाले.

धादांत खोटे वृत्त प्रसिद्ध करून सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याप्रकरणी दैनिक लोकसत्ताला सनातनची कायदेशीर नोटीस !

सनातन संस्थेच्या धर्मप्रसाराच्या वाढत्या कार्याची व्याप्ती आणि त्यामुळे सनातन संस्थेचा समाजात असलेला नावलौकिक माहिती असतांना मानहानी करण्याच्या हेतूने दैनिक लोकसत्ता या मराठी वृत्तपत्राने खोटे वृत्त प्रसिद्ध केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या लिखाणावर समाजातील एका जात्यंध व्यक्तीने केलेली एकांगी टीका आणि तिचे खंडण

८.१.२०१७ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’ या सदरात ‘ब्राह्मणद्वेष्ट्यांनो, हे लक्षात घ्या’, या मथळ्याखाली एक चौकट प्रसिद्ध झाली होती. सामाजिक संकेतस्थळांवर या चौकटीतील लिखाणावर एकांगी टीका करणारा एक संदेश प्रसारित करण्यात येत होता.

लोकहो, प्रवचन घेण्यासाठी सनातन संस्था कोणतेही मूल्य आकारत नाही, हे लक्षात घ्या आणि अपप्रचारांपासून सावध रहा !

सनातनच्या वतीने सर्व प्रकारची प्रवचने ही विनामूल्यच घेण्यात येतात. सनातन संस्था ही धर्मप्रसार करणारी संस्था असून केवळ प्रवचनच नव्हे, तर संस्थेच्या वतीने राबवण्यात येणार्‍या कोणत्याही उपक्रमासाठी पैसे घेण्यात येत नाहीत.

दैनिक टाइम्स ऑफ इंडियाच्या विरोधात सनातन संस्थेचा मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दिवाणी दावा !

सनातन संस्थेच्या वाढत्या प्रसाराची व्याप्ती आणि संस्थेचा समाजातील नावलौकिक माहिती असतांना संस्थेची अपकीर्ती करण्याच्या हेतूने दैनिक टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने संस्थेच्या विरोधात मानहानीकारक लेख प्रसिद्ध करून संस्थेची मानहानी केली.