श्राव्य दालन – ऑडिओ गॅलरी (Audio Gallery)

ऑडिओ गॅलरी यात आपण नामजप, आरती, स्तोत्र, पाळणा अन्य बरेच काही ऐकू शकता. आपण नामजप, आरती आदी कृती भावपूर्ण केल्यास मनोकामना पूर्ण होतात. त्या दृष्टीने तात्त्विक विवेचन अनेक ठिकाणी उपलब्ध असते; पण शब्दांचे योग्य उच्चार, देवतेला आळवणे, आर्तभाव आदी गोष्टी अधिकारी व्यक्तींकडून प्रत्यक्ष शिकाव्या लागतात. सध्या धकाधकीच्या जीवनात तसे करणे शक्य नसते. त्यामुळे या ऑडिओ गॅलरी मध्ये भाव असणार्‍या साधकांनी संत वा अधिकारी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली म्हटलेले नामजप, आरती, पाळणे आदी येथे उपलब्ध केले आहेत. त्यानुसार आरती आदी भावपूर्ण म्हटल्यास आध्यात्मिक उन्नतीस चालना मिळेल, तसेच त्यांद्वारे सात्त्विक वातावरण निर्मिती होण्यासही साहाय्य होईल.

येथे दिलेल्या कोणत्याही एका ऑडिओ वर क्लिक केल्यावर तो सुरु होईल आणि पुन्हा पुन्हा Play होत राहील. मोबाईल वर ऐकणाऱ्यांनी स्क्रीन लॉक जर केले तरी ऑडिओ थांबणार नाही, त्यामुळे स्क्रीन सुरु ठेवण्याची आवश्यकता नाही.

हनुमंताच्या भक्तीचे माहात्म्य सांगणारा हनुमान जयंतीनिमित्तचा विशेष भक्तीसत्संग !

श्रीविष्णूने श्रीरामाच्या रूपात पृथ्वीतलावर दिव्य अवतार धारण केला. त्यानंतर अवघ्या ५ दिवसांनी रामकार्यात सहयोग देण्यासाठी भगवान शंकराने हनुमंताच्या रूपात अवतार घेतला. हनुमानाच्या तन-मनाच्या कणाकणात प्रभु श्रीराम असून त्याचे आचरण राममय आहे. रामभक्ती हाच त्याचा मंत्र आणि रामसेवा हाच त्याचा ध्यास आहे. अशा हनुमंताची परम भक्ती शिकण्यासाठी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) यांच्या चैतन्यदायी वाणीतील हा भक्तीसत्संग श्रवण करूया.

या सत्संगात जाणून घेऊया…

१. हनुमंताचे दिव्य अवतारधारण !

२. अंजनीसारख्या वीरमातेच्या पोटी जन्मलेला तेजस्वी पुत्र हनुमान !

३. श्रीरामाने केलेली हनुमंताची स्तुती !

४. हनुमंताची दास्यभक्ती सांगणारे काही प्रसंग !

भक्तीसत्संग (रामनवमी विशेष)

२२.१.२०२४ या दिवशी साक्षात् श्रीरामलल्ला मूर्तीरूपाने अयोध्येत विराजमान झाला आहे. त्यामुळे यावर्षीचा रामनवमीचा उत्सव समस्त रामभक्तांसाठी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या अंतरात ‘श्रीरामलल्लाविषयीची भक्ती वाढून त्याच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ घेता यावा’, यासाठी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) यांच्या चैतन्यदायी वाणीतील हा भक्तीसत्संग श्रवण करूया आणि त्याद्वारे श्रीरामप्रभूच्या दिव्य लीलांची प्रत्यक्ष अनुभूती घेऊया.

या विशेष भक्तीसत्संगात श्रीरामाच्या अवतारी बाललीला जाणून घेऊया ! : त्रेतायुगात श्रीरामजन्मामुळे अयोध्येसह सर्वत्रचे वातावरणच पालटले. ‘आपल्या गोंडस आणि लडिवाळ रूपाने, बालसुलभ लीलांनी अन् मधुर बोबड्या बोलांनी श्रीरामाने माता कौसल्या, पिता राजा दशरथ, महालातील सेवेकरी, संपूर्ण महाल आणि सारी अयोध्यानगरी या सार्‍यांना मंत्रमुग्ध करणे, एकाच वेळी दोन रूपे घेऊन माता कौसल्येला भुलवणे, मातेला विराट रूपात दर्शन देणे’, अशा रामलीलांचे सुंदर वर्णन ऐकून त्याच्या अवतारत्वाची प्रचीती घेऊया.

भक्तीसत्संग (महाशिवरात्री विशेष)

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या चैतन्‍यदायी वाणीतील महाशिवरात्री निमित्तच्या विशेष भक्‍तीसत्‍संगाचे भावपूर्ण श्रवण करूया. आपल्‍या अंतरातील शिवभक्‍ती वृद्धींगत होण्‍यासाठी जगद़्‍पिता भगवान शिवाचा महिमा जाणून घेऊया । या सत्संगात ऐका, १२ ज्‍योतिर्लिंगांचे दिव्‍य माहात्‍म्‍य आणि भगवान शिवाच्‍या प्राप्‍तीसाठी आदिशक्ति पार्वतीने केलेली कठोर तपस्‍या.

श्री गणेश ॥ ॐ गँ गणपतये नमः ॥

श्री गणेश ॥ श्री गणेशाय नमः ॥

श्री गुरुदेव दत्त (तारक) ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

श्री गुरुदेव दत्त (मारक) ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

श्री गुरुदेव दत्त ॥ ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॥

भग‍वान शिव ॥ ॐ नम: शिवाय ॥

श्री राम ॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥

श्री हनुमान ॥ श्री हनुमते नमः ॥

श्रीकृष्ण ॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥

कुलदेवता ॥ श्री कुलदेवतायै नमः ॥

श्री दुर्गादे‍वी ॥ श्री दुर्गादेव्यै नमः ॥

श्री अंबादेवी ॥ श्री अंबादेव्यै नमः ॥

श्री भवानीदे‍वी ॥ श्री भवानीदेव्यै नमः ॥

श्री रेणुकादे‍वी ॥ श्री रेणुकादेव्यै नमः ॥

श्री महालक्ष्मीदेवी ॥ श्री महालक्ष्मीदेव्यै नमः ॥

श्री सप्तशृंगीदेवी ॥ श्री सप्तशृंगीदेव्यै नमः ॥

श्री योगेश्वरीदेवी ॥ श्री योगेश्वरीदेव्यै नमः ॥

ओमिक्रॉन विषाणूपासून रक्षण होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर बळ मिळावे यासाठी नामजप

श्री गणपति अर्थवशीर्ष

राम रक्षा स्तोत्र

श्री मारूती स्तोत्र

श्री गणेश स्तोत्र

श्री आदित्यहृद्य स्तोत्र

श्री बगलादिगबंधन स्तोत्र

श्री सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र

देवी कवच

श्रीकृष्णाष्टकम्

‘कोरोना’च्या साथीमध्ये स्वतःची प्रतिकारक्षमता आणि आध्यात्मिक बळ वाढावे, यासाठी उपयुक्त मंत्र (1)

‘कोरोना’च्या साथीमध्ये स्वतःची प्रतिकारक्षमता आणि आध्यात्मिक बळ वाढावे, यासाठी उपयुक्त मंत्र (2)

‘कोरोना’च्या साथीमध्ये स्वतःची प्रतिकारक्षमता आणि आध्यात्मिक बळ वाढावे, यासाठी उपयुक्त मंत्र (3)

ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ

शून्‍य

महाशून्‍य

निर्गुण

निर्विचार ॥ निर्विचार ॥

श्री निर्विचाराय नमः ॥ श्री निर्विचाराय नमः ॥

ॐ निर्विचार ॐ निर्विचार

श्रीकृष्णाचा पाळणा

श्रीरामाचा पाळणा

आदी शक्ती तू अंत शक्ती तू…

सनातन धर्म सूर्य उगवला…

‘जय रघुनंदन जय सीयाराम’ची नामधून

सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेल्या चैतन्यमय नामधून

याविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी येथे click करा ! … चैतन्यमय नामधून

प्रस्तावना

राम कृष्ण हरि

राधा राधाकृष्ण राधा

राधा राधाकृष्ण राधा, हरि ॐ तत्सत् ।

विठ्ठल विठ्ठल

ज्ञानेश्‍वर माऊली एकनाथ नामदेव तुकाराम

पावना दत्ता पतितपावना दत्ता

हरि ॐ तत्सत् ।

सनातनचे संत सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी गायलेली भावगीते आध्यात्मिक उपायांसाठी उपयुक्त !

याविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी येथे click करा ! … सनातनचे संत सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी गायलेली भावगीते

आनंद कंद दाता

जय जय महाराष्ट्र

कान्हा तु खोड्या करु नको

नको देवराया

या जन्मावर, या जगण्यावर

दर्शन दे रे

वंदुया निखिल ब्रम्ह अवधुता

देहा रंगी रे

ओंकार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनाविषयक प्रवचन

परात्पर गुरु डाॅ. आठवले यांनी साधकांना केलेले साधनेसंदर्भातील मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनाविषयक प्रवचन

परात्पर गुरु डाॅ. आठवले यांनी साधकांच्या शंकांचे केलेले निरसन (ऑडिओ)

मानस सर्व देहशुद्धी

ईश्‍वरी चैतन्याने सर्व देह चैतन्यमय करण्यासाठी पू. राजेंद्र शिंदे यांनी दिलेली एक अभिनव उपायपद्धत !

याविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी येथे click करा ! … मानस सर्व देहशुद्धी

आध्यात्मिक उपाय, तसेच साधनावृद्धी आणि भाववृद्धी यांसाठी प्राप्त झालेले दैवी (सात्त्विक) नाद !

भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने आणि प.पू. डॉक्टरांच्या आशीर्वादाने रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आणि देवद आश्रमात विविध माध्यमांतून प्राप्त झालेले दैवी नाद, तसेच त्यांची माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दैवी नादांच्या उपयोगाने आपल्या साधनेला गती मिळणार असून, यातील काही नाद भावजागृतीसाठी, तसेच काही नाद आध्यात्मिक उपायांसाठीही उपयुक्‍त आहेत.

नाद ऐकण्यासाठी तसेच याविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी येथे click करा ! … दैवी (सात्त्विक) नाद

Spiritual Guidance