लासलगाव येथे ३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !

मुख्याध्यापकांकडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याचे कौतुक

विषय ऐकतांना विद्यार्थी

लासलगाव – येथे ३ शाळांमध्ये राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावर प्रवचन घेण्यात आले. राष्ट्रभक्तीच्या संदर्भातील माहिती प्रवचनांमधून देण्यात आली. श्री महावीर जैन विद्यालय, जिजामाता कन्या विद्यालय, लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय अशा तीन शाळांमधून २ सहस्र ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला. यासाठी सौ. माधुरी गोसावी, सौ. हर्षदा घायाळ, श्री. पंकज पाटील, श्री. संतोष गोसावी, श्री. नीलेश बोरा यांनी परिश्रम घेतले. तीनही शाळांच्या मुख्याध्यापकांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याचे कौतुक केले आणि असे मार्गदर्शन म्हणजे काळाची आवश्यकता असल्याचे सांगितले.

 

Leave a Comment