‘गोबेल्‍स’ नीतीचा अवलंब करणार्‍या ‘बीबीसी’ला राष्‍ट्रभक्‍तांनी धडा शिकवायला हवा ! – अभय वर्तक, सनातन संस्‍था

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित ‘भारतविरोधी ‘बीबीसी’चा हिंदुद्वेष’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

 

मुंबई – ज्‍या ब्रिटिशांनी आपल्‍या भारताची संपत्ती लुटली, आपला कोहिनूर हिरा चोरला, अशा चोर ब्रिटिशांचा प्रचार करणारी ‘बीबीसी’ वृत्तवाहिनी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वर्ष २००२ च्‍या गुजरात दंगलीविषयी सर्वोच्‍च न्‍यायालयाने निर्दोष ठरवून सुद्धा त्‍यांना त्‍या दंगलीविषयी उत्तरदायी धरले जाणे आणि त्‍यावर ‘‘बीबीसी’ने केलेली ‘डॉक्‍युमेंट्री’ (माहितीपट) हे केवळ त्‍यांच्‍यावरील आक्रमण आहे’, असे संकुचित दृष्‍टीने न पहाता हे ‘हिंदूंवरील आक्रमण’ या दृष्‍टीने पहायला हवे. ‘भारताच्‍या फाळणीच्‍या वेळी हिंदु स्‍त्रिया आणि भगिनी यांच्‍यावर झालेले अत्‍याचार’, ‘मोपला हत्‍याकांड’, ‘हिंदूंच्‍या मंदिरांचा विध्‍वंस’ या विषयांवर ‘बीबीसी’ कधी ‘डॉक्‍युमेंट्री’ करणार नाही. ‘भारताचे पुन्‍हा विभाजन व्‍हावे, भारत हिंदु राष्‍ट्र घोषित होऊ नये आणि भारताची प्रगती होऊ नये’, यासाठी देशविरोधी शक्‍ती कार्यरत आहे. ‘बीबीसी’ हा त्‍यांचा चेहरा आहे.

श्री. अभय वर्तक

‘गोबेल्‍स नीती’चा (एखादी गोष्‍ट वारंवार सांगितली, तर ती लोकांना सत्‍य वाटू लागते) अवलंब करणार्‍या ‘बीबीसी’च्‍या ‘डॉक्‍युमेंट्री’वर केवळ बंदी आणून चालणार नाही, तर देशातील राष्‍ट्रभक्‍त लोकांसह सर्व संघटनांनी मिळून ‘बीबीसी’ला धडा शिकवायला हवा, असे स्‍पष्‍ट प्रतिपादन ‘सनातन संस्‍थे’चे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘भारतविरोधी ‘बीबीसी’चा हिंदुद्वेष’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद आयोजित करण्‍यात आला होता. त्‍या वेळी ते बोलत होते.


 

‘बीबीसी’च्‍या माध्‍यमातून भारताच्‍या विरोधात ‘माहिती युद्ध’ ! – श्रीलक्ष्मी राजकुमार, पत्रकार, कर्नाटक

श्रीलक्ष्मी राजकुमार

‘बीबीसी’च्‍या ‘डॉक्‍युमेंट्री’मध्‍ये मोदीजींवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण केले आहे. हे प्रश्‍नचिन्‍ह केवळ मोदींवर नसून भारताच्‍या जनतेवरही आहे; कारण भारतीय जनतेने मोदीजींना निवडून दिले आहे. ‘बीबीसी’ला चीनच्‍या आस्‍थापनांकडून आर्थिक पुरवठा केला जात असून भारताच्‍या विरोधात ‘माहिती युद्ध’ छेडले आहे. ‘वर्ष २०२४ च्‍या निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर हे केले जात आहे’, अशी शंका निर्माण केली जात आहे. भारत आता एक जागतिक नेतृत्‍व बनत असून त्‍याला कमकुवत करण्‍याचे कारस्‍थान ‘बीबीसी’ आणि त्‍याला पाठिंबा देणारे करत आहेत.

Leave a Comment