हिंदूंनो, धर्मशिक्षणाचा अभाव किंवा धर्मद्रोह यांमुळे होणार्‍या अपप्रचाराला बळी पडू नका !

एकमेकांना आपट्याचे पान दिल्यामुळे दोन्ही व्यक्तींतील त्याग आणि प्रीती यांत वाढ होते. दसरा हा विजयाचा दिवस असल्यामुळे या दिवशी आपट्याचे मौल्यवान पान एकमेकांना देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात येतो.

१० हा अंक आणि विजयादशमी

१० अंकाला (दश इंद्रियांना) खर्‍या अर्थाने समजून घेऊन त्याचे हरण करणे, म्हणजे दशहरा होय; एकूण साधनेद्वारे इंद्रियनिग्रह झाल्यावर, म्हणजेच स्वतःवर विजय मिळवल्यावर साधक खर्‍या अर्थाने कोणत्याही परिस्थितीशी सामना करून विजय मिळवू शकतो

हिंदूंनो, विजयोपासनेला आरंभ करा ! – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

विजयादशमी म्हणजे हिंदूंच्या धर्मविजयाचा दिवस ! याच दिवशी श्री दुर्गादेवी आणि प्रभु श्रीराम यांनी अनुक्रमे महिषासुर आणि रावण या दोन असुरांचा वध करून आसुरी (अधर्मी) शक्तींचे निर्मूलन केले.

दसरा (विजयादशमी)

दसरा सणाचे असलेले असाधारण महत्त्व लक्षात घेता तो खरोखरच मोठा असल्याची प्रचीती आपणाला येते. या सणाला आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.