राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात सनातन संस्थेच्या साधिकेने केलेल्या प्रबोधनामुळे युवक प्रभावित

युवकांचा ७ फेब्रुवारीला सोलापूरला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहाण्याचा निर्धार !

इंदिरानगर येथील श्री सिद्ध गणेश हनुमान मंदिरात धर्मसभेचा विषय मांडतांना सौ. सुधा घाटगे

सोलापूर – येथील ७० फूट रस्त्यावरील, इंदिरानगर येथील चौकामध्ये २६ जानेवारीला ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाची रांगोळी काढली होती, तसेच राष्ट्रध्वजाचे चित्र असलेले फटाके फोडण्यात आले होते. हे पाहून सनातन संस्थेच्या सौ. सुधा घाटगे यांनी तेथील ८-१० युवकांना राष्ट्रध्वजाची रांगोळी अन् फटाके यांमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो, हे पटवून योग्य कृती काय करायला हवी, हे समजावून सांगितले. या प्रबोधनातून प्रभावित होऊन एका युवकाने इंदिरानगर येथील श्री सिद्धगणेश हनुमान मंदिरात अन्य ३५ युवकांना एकत्र केले. या वेळी सौ. घाटगे यांनी राष्ट्र आणि धर्माभिमानाचे महत्त्व सांगितले. हा विषय ऐकून सर्वांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. त्यानंतर सौ. घाटगे यांनी सोलापूर येथे ७ फेब्रुवारीला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेला येण्याचे आवाहन केले. त्यानंतर सर्वश्री संजय चिलगुंडे, विक्रम मोरे, अजय शेगाव यांनी पुष्पगुच्छ आणून सौ. घाटगे यांचा सत्कार केला.

वैशिष्ट्यपूर्ण

१. येथील धर्मप्रेमींनी महिलांच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाची मागणी केली आणि धर्मजागृती सभेचा विषय सांगण्यासाठी युवतींची बैठक ठरवली.

२. उपस्थित युवकांनी आम्ही हिंदु धर्मजागृती सभेला येणारच, तसेच नियमित धर्मशिक्षण मिळण्यासाठी धर्मशिक्षणवर्ग चालू करा, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment