हिंदु संस्कृतीशी साम्य असलेल्या विश्‍वातील प्राचीन संस्कृती

‘आजपासून ४ सहस्र वर्षांपूर्वी ज्या सभ्यता-संस्कृती जिवंत होत्या, त्यांना पाश्‍चात्त्य इतिहासकारांनी प्राचीन सभ्यता समजूनच मानवाचा इतिहास आणि समाज यांचे विश्‍लेषण केले; परंतु त्यांचे हे विश्‍लेषण ख्रिस्ती धर्म स्थापित करणारे होते. यासाठी त्यांनी भारत आणि चीन यांच्या इतिहासाला महान असल्याचे दर्शवणारी अशी कितीतरी उदाहरणे नाकारली. वास्तविक ख्रिस्तीनंतरच्या समाजापेक्षा कितीतरी अधिक सभ्य असल्याचे ते सिद्ध होत आहेत. प्राचीन सभ्यता आणि संस्कृती यांच्यावर झालेल्या संशोधनामध्ये अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. उदा. त्यांचा अन्य ग्रहांवरील लोकांशी संबंध होता आणि तेही वीजनिर्मितीचे तंत्र जाणत होते इत्यादी.

पृथ्वीवर पसरलेल्या प्राचीन सभ्यतांवर बोलायचे झाले, तर पृथ्वीच्या पश्‍चिम टोकावर रोम, ग्रीस आणि मिस्र या देशांच्या सभ्यता-संस्कृतींचे नाव घेतले जाते, तर पृथ्वीच्या पूर्व टोकावर चीनचे नाव घेतले जाते. पृथ्वीच्या मध्यभागी असलेल्या भारताचा मात्र केवळ पुसटसा उल्लेख करून सोडून दिले गेलेे; कारण भारताला जाणून घेतल्यावर पाश्‍चात्त्य समाज आणि धर्म यांचे सर्व मापदंड ढासळू लागतात. खरेतर भारतीय संस्कृती युनान, रोम, मिस्र, सुमेर आणि चीन यांच्या संस्कृतींपेक्षाही प्राचीन आहे.

अधिक माहिती वाचा…

इंडोनेशिया

कंबोडिया

श्रीलंका

मलेशिया

बांगलादेश

थायलंड