रांगोळी
हिंदु धर्मातील सर्व सण, उत्सव तसेच व्रते यांवेळी रांगोळी काढली जाते. हिंदु धर्मातील सर्व सण, उत्सव तसेच विधी कोणत्यातरी देवतेशी संबंधित असतात. सण, उत्सव तसेच विधी यांच्या वेळी त्या देवतेचे तत्त्व वातावरणात नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात असते. ते तत्त्व अधिक प्रमाणात यावे आणि त्याचा सर्वांना लाभ व्हावा; म्हणून ते तत्त्व आकृष्ट, तसेच प्रक्षेपित करणार्या रांगोळ्या काढाव्यात.