सनातन आश्रमाला संत आणि मान्यवर यांची भेट

सनातन आश्रम म्हणजे रामराज्याची अनुभूती देणार्‍या हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृती ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था, गोवा.

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रम म्हणजे सनातन संस्थेचे मुख्यालय ! हा आश्रम म्हणजे रामराज्याची अनुभती देणार्‍या हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृती आहे. या आश्रमाने अनेकांना साधनेत दिशादर्शन करून आमच्या जीवनाचे सार्थक केले आहे. या आश्रमाच्या माध्यमातून विदेशातील कितीतरी जणांना हिंदु धर्म शिकण्याची संधी मिळाली आहे. आश्रमात रहाणारे ४०० साधक शिस्तबद्ध जीवन जगतात. या शिस्तबद्धतेतही साधकांचे आपापसांत निरपेक्ष प्रेम आहे. त्यामुळे सनातन आश्रम हे ४०० सदस्यांचे एक कुटुंबच बनले आहे. ईश्‍वरप्राप्तीच्या माध्यमातून एकसंध समाज निर्माण करता येतो आणि रामराज्याची अनुभूती घेता येते, हे सनातनच्या आश्रमातून अनुभवता येते. माझी आपल्याला विनंती आहे की, आपण सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट द्यावी.

संतांचे आशीर्वाद

मान्यवरांचे अभिप्राय

सनातन आश्रमांची वैशिष्ट्ये