हिंदु राष्ट्र जागृती अभियानामुळे भारतभरातील हिंदूंमध्ये नवचैतन्य !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरत कार्य करणारे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त देशभरात श्रीरामनवमीपासून (१०.४.२०२२ पासून) ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे. भारतभरातील हिंदु धर्मप्रेमींमध्ये या अभियानामुळे नवचैतन्य निर्माण झाले असून व्यापक धर्मप्रसार होत आहे. या अभियानाच्या अंतर्गत देशभरात राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांत आतापर्यंत एकूण ४४ सहस्र ५४१ हिंदूंनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन चैतन्याच्या स्तरावर लाभ घेतला आहे.

कोल्हापूर येथील दिंडीत सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ

 

१. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवतांना साकडे

आगामी भीषण युद्धानंतर भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी अभियानाच्या अंतर्गत ठिकठिकाणी मंदिरांत देवतांना साकडे घालण्यात आले. देशभरात ३२ सहस्र २२० हिंदु धर्मप्रेमी आणि साधक यांनी एकत्र येऊन १ सहस्र २० हून अधिक मंदिरांमध्ये देवतांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साकडे घातले.

 

२. तणावमुक्त आणि आनंदी जीवनासाठी मार्गदर्शक प्रवचने

सध्याच्या अनिश्चित आणि असुरक्षित जीवनात लोकांना तणावमुक्त अन् आनंदी जीवन जगता यावे, यासाठी अध्यात्म अंगीकारणे म्हणजे साधना करणे आवश्यक बनले आहे. साधनाच मनुष्याला चिरंतन आनंद प्रदान करू शकते. सनातनच्या साधकांनी १९४ ठिकाणी घेतलेल्या साधना प्रवचनांचा लाभ ४ सहस्र ९८१ जिज्ञासूंनी घेतला.

 

३. हिंदूसंघटनाचा आविष्कार ठरलेली हिंदू एकता दिंडी

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आवश्यक आहे, हिंदूंचे संघटन ! त्यासाठी माध्यम बनली हिंदू एकता दिंडी ! देवता आणि गुरु यांच्या आशीर्वादामुळे हिंदु धर्म अन् भारत देश यांच्यावर होणारे विविध आघात रोखण्यासाठी आता हिंदू जागृत होऊन एकत्रही येत आहेत. हिंदू संघटनाचा आविष्कार ठरलेल्या हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदूसंघटनाची गगनभेदी ललकारी आसमंतात निनादली. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे झालेल्या भव्य दिंडीत २ सहस्र, तर गोवा राज्यात झालेल्या दिंडीत १ सहस्र हिंदू सहभागी झाले होते. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांत झालेल्या ८ हिंदू एकता दिंड्यांमध्ये ३ सहस्र ९५५ धर्मप्रेमी सहभागी झाले होते, तर महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे आणि नाशिक येथेही दिंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

आमोणा (गोवा) येथील श्री वेताळ मंदिरात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी गाऱ्हाणे घालतांना धर्मप्रेमी

 

४. चैतन्यदायी मंदिरांची स्वच्छता आणि ज्ञानदायी ग्रंथांची प्रदर्शने

मंदिर म्हणजे समाजाचे देवघर असून ते हिंदूंसाठी चैतन्याचे स्रोतच आहेत.  देशभरातील २८० मंदिरांचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. यात ३ सहस्र १२८ हिंदू सहभागी झाले होते.  राज्यांत ६ ठिकाणी धर्मज्ञान देणाऱ्या सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात आले. ज्यात २५७ धर्मप्रेमी आणि साधक सहभागी झाले होते.

 

५. १३ राज्यांतील ४५ जिल्ह्यांमधीलधर्मप्रेमी आणि साधक यांचा सहभाग

महाराष्ट्रात, गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, केरळ, उत्तर भारतातील देहली, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश, तर पूर्वाेत्तर भारतातील झारखंड अशा एकूण १३ राज्यांतील ४५ जिल्ह्यांमध्ये हे उपक्रम राबवण्यात आले. ज्यात हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना-संप्रदायांचे प्रतिनिधी, सनातन संस्थेसह विविध आध्यात्मिक संस्थांचे साधक, मंदिरांचे पुजारी आणि भक्त यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमांच्या वेळी हिंदु संघटनातून उपस्थितांमध्ये हिंदु राष्ट्राचे स्फुल्लिंग चेतवले आणि अनेकांना आध्यात्मिक अनुभूतीही आल्या.

Leave a Comment