प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘झियान इंग्लिश मीडियम प्री-प्रायमरी स्कूल’ येथे झालेल्या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन !

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आधुनिक वैद्या (श्रीमती) मृणालिनी भोसले (डावीकडे) आणि शेजारी श्री. निरंजन आवटी

मिरज – जैन बस्ती येथील ‘झियान इंग्लिश मीडियम प्री-प्रायमरी स्कूल’ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमप्रसंगी सनातन संस्थेच्या साधिका आधुनिक वैद्या (श्रीमती) मृणालिनी भोसले यांना निमंत्रित केले होते या वेळी श्रीमती मृणालिनी भोसले यांनी उपस्थितांचे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’, याविषयी प्रबोधन केले. शाळेचे शिक्षक, पालक, विद्यार्थी असे ६५ जण उपस्थित होते.

श्रीमती मृणालिनी भोसले यांना कार्यक्रमासाठी बोलवण्यात भाजप नगरसेवक श्री. निरंजन आवटी यांचा पुढाकार होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment