हिंदूजनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेली विविध जिल्ह्यांतील ‘हिंदू एकता दिंडी’ !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले. या दिंड्यांमुळे शहरांतील वातावरण चैतन्यमय होऊन सोलापूर येथे ५ सहस्र ५००, पुणे येथे ५ सहस्र, तर गोवा येथे २ सहस्र हिंदूंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या दिंड्यांमध्ये हिंदू एकतेचा आविष्कार पहायला मिळाला. या दिंड्यांमध्ये हितचिंतकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र असलेल्या पालखीचे भावपूर्ण पूजन केले, तर दिंड्यांच्या मार्गावर अनेक जिज्ञासूंनी धर्मध्वज आणि पालखी यांवर उत्स्फूर्तपणे पुष्पवृष्टी केली. दिंड्यांना समाजातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, ही सनातनच्या कार्याला पाठिंबा देणारी पोचपावतीच आहे !

 

सोलापूर

विद्यानिकेतन हायस्कूल आणि हिंगुलांबिका शाळा यांचे ढोलपथक

सोलापूर येथील सनातनच्या हितचिंतकांकडून चौकाचौकांमध्ये दिंडीवर फुलांचा वर्षाव केला जात होता. त्यांपैकी एक हितचिंतक उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘‘तुम्ही एवढे मोठे धर्माचे कार्य करत आहात, एवढी मोठी दिंडी काढली आहे, यावर फुलांचा वर्षाव करणे, एवढे तर आम्ही करू शकतो. हे आम्ही करायलाच हवे.’’

दिंडीवर पुष्पवृष्टी

सोलापूर येथील अनेक जण दिंडी पाहून प्रभावित झाले. काही जणांच्या डोळ्यांतून भावाश्रू आले. ते म्हणाले, ‘‘हिंदू एकतेची दिंडी पाहून ‘आता हिंदु राष्ट्र येणारच आहे’, अशी निश्चिती झाली.’’\

सोलापूर येथे श्री. प्रेमकुमार झाड यांनी धर्मध्वजासमवेत स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके करणाऱ्या युवा पथकावरही पुष्पवृष्टी केली. त्यासाठी त्यांनी अधिकची फुलेही मागवली. या वेळी त्यांचे डोळे कृतज्ञताभावाने भरून आले होते. ते म्हणाले, ‘‘ही मुले लहान वयात धर्मकार्य करत आहेत. मी त्यांच्यावर फुले उधळून तरी कृतज्ञता व्यक्त करू शकतो.’’

स्वरक्षण प्रशिक्षण पथक

दिंडीमध्ये सहभागी झालेले धर्मप्रेमी उद्योजक उस्फूर्तपणे म्हणाले, ‘‘दिंडीचे नियोजन पुष्कळ छान आहे. अशी दिंडी प्रत्येक गावागावांत व्हायला हवी.’’

 

सावंतवाडी

शिस्तबद्ध संचलन

 

पुणे

हिंदूंची एकजूट करणाऱ्या अशा दिंडी सर्वत्र व्हाव्यात ! – पुणे येथील धर्मप्रेमी

पालखीतील छायाचित्राचे पूजन

श्री. धनंजय धांडेकर, पुणे – ‘हिंदू जागृत झाला आहे’, हे दिंडी पाहून लक्षात येते. हिंदु राष्ट्र येणारच आहे. ‘अद्भुत’, ‘अविश्वसनीय’ असेच या दिंडीचे वर्णन करता येईल.

श्री. जगदीश गुप्ता, पुणे – भारत अधिकृतपणे हिंदु राष्ट्र म्हणून घोषित व्हायला हवे. त्यासाठी दिंड्या व्हायला हव्यात.

एक पोलीस कर्मचारी – मागील १५ वर्षांत एवढी सुंदर रचना असलेली आणि शिस्तबद्ध मार्गक्रमण करणारी पहिलीच फेरी मी पाहिली.

श्री. उमेश कदम, संपादक, दैनिक ‘राष्ट्रतेज’ – ही दिंडी अतिशय शिस्तबद्ध झाली. दिंडीचे नियोजन पुष्कळ चांगले होते.

श्री. अनुपम प्रकाशराव राऊते, नातेपुते – आज कामानिमित्त पुण्यात आलो होतो. ही एकता दिंडी पाहून अत्यंत अभिमान वाटतो. सध्या हिंदूंच्या एकजुटीची आवश्यकता आहे.

श्री. गणेश पराडे, पुणे – सर्वांनी राजकारण, पक्ष, संघटना बाजूला सारून एकत्र यायला हवे. प्रत्येकाने धर्मासाठी दिवसातील थोडा तरी वेळ द्यायला हवा. दिंडी पाहून पुष्कळ छान वाटले.

सुप्रिया मिश्रा (मूळ प्रयागराज) – महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदूंचे संघटन पाहून चांगले वाटले. उत्तर भारताप्रमाणे महाराष्ट्रातही संघटन होत आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जसे कार्य तेथे करत आहेत, तसेच कार्य महाराष्ट्रात सनातन संस्था करत आहे.

मंगलकलश घेतलेल्या महिला

८. कोलवडी (जिल्हा पुणे) येथील धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमी युवक पुणे येथील हिंदू एकता दिंडीत सहभागी झाले होते. हे धर्मप्रेमी दूरच्या गावात रहात असल्याने घरातील आणि शेतातील पुष्कळ कामे लवकर करून दिंडीत सहभागी झाले होते. त्यातील दोघांनी दिंडीला येण्यासाठी सायंकाळी त्यांची दुकाने बंद ठेवली होती, तसेच दोघांनी सायंकाळी गायीचे दूध काढून डेअरीला देण्याचे रहित केले. गायीच्या वासरांना पोटभरून दूध मिळावे, यासाठी वासरे गायींजवळ सोडून दिली आणि दिंडीत सहभागी झाले. ते म्हणाले, ‘‘प्रतिदिनच्या कामांपेक्षा आज आमच्यासाठी दिंडीत सहभागी होणे अधिक आवश्यक होते.’’

९. सोरतापवाडीचे श्री. दत्तात्रेय चोरघे हे ‘चिंतामणी प्रासादिक दिंडी’तील २७ वारकऱ्यांचे पथक घेऊन दिंडीत सहभागी झाले होते. त्या वारकऱ्यांनी दिंडी झाल्यानंतर सांगितले की, ‘या हिंदू एकता दिंडीत सहभागी होता आले, ही केवळ पांडुरंगाची कृपा आहे. आमच्यासाठी हा वेगळा अनुभव आहे.’ वारकरी मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब चौधरी आणि श्री. दत्तात्रेय चोरघे यांनी सांगितले की, ‘आम्ही आमच्या गावात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे नियोजन करतो. आपण आमच्या गावातही जागृती करा. आम्ही सभेसाठी लागणारे सर्व सहकार्य करू.’

पुणे येथे ‘आराध्य रंगावली’ आणि ‘सोमनाथ आर्ट’ यांनी दिंडी मार्गावर काढलेली हिंदूऐक्याचा संदेश देणारी रांगोळी

१०. वडगाव शेरी (जिल्हा पुणे) येथील धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमी श्री. अजित सुतार हे संस्कृत बालशिक्षण मंडळ चालवतात. ते त्यांच्यासमवेत मंडळातील मुलांना घेऊन दिंडीमध्ये सहभागी झाले होते. दिंडीच्या मार्गात एके ठिकाणी त्यांनी धर्मध्वज आणि दिंडीतील पालख्यांवर पुष्पवृष्टी केली. श्री. अजित सुतार म्हणाले, ‘‘या दिंडीमुळे हिंदूंना शक्ती मिळाली आहे. संपूर्ण दिंडीत आनंदाचे आणि दैवी वातावरण अनुभवायला मिळाले.’’

‘दिंडीत सहभागी झालेल्यांची संख्या पाहून एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदूंचे संघटन होत आहे’, हे प्रथमच पाहत आहोत’, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली.

पुणे येथे ‘आराध्य रंगावली’ आणि ‘सोमनाथ आर्ट’ यांनी दिंडी मार्गावर काढलेली हिंदूऐक्याचा संदेश देणारी रांगोळी

 

पुणे येथील दिंडीतील क्षणचित्रे

१. ‘दिंडी परत कधी अनुभवण्यास मिळणार ?’, असे वाटून श्रीमती संजीवनी लिमये (वय ७८ वर्षे) या वयोवृद्ध आजी दिंडीमध्ये उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.

२. दिंडी पाहून रस्त्यावरील नागरिक उत्स्फूर्तपणे घोषणा देत होते.

३. पुणे येथील लक्ष्मी रस्त्यावरून दिंडी मार्गक्रमण करत असतांना एका दुकानातील वयस्कर महिलेने दिंडीला भावपूर्ण नमस्कार केला. त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या पालखीकडे बोट दाखवून पुणे जिल्ह्याच्या जिल्हासेवक ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. मनीषा पाठक यांना विचारले, ‘‘तू यांची लेक ना ?’’ त्या आजींनी सौ. मनीषा पाठक यांची दृष्टही काढली.

पुणे येथील दिंडीमध्ये धर्मप्रेमी नागरिकांचा विशेष सहभाग

दिंडीच्या मार्गावर ‘शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक केले.

दापोडी येथून मशाल घेऊन धर्मप्रेमी श्री. कृष्णा माने आणि श्री. प्रथमेश फुगे हे दिंडीत सहभागी झाले होते, तर सुरेश पांडुरंग भांडे (गोंधळी) यांनी दिंडीमध्ये संबळ वादनाद्वारे सहभाग नोंदवला.

‘पांचजन्य शंखनाद पथका’ने दिंडी मार्गावर आणि प्रत्येक चौकात भावपूर्ण शंखनाद केला.

सोरतापवाडीचे श्री. दत्तात्रेय चोरघे हे ‘चिंतामणी प्रासादिक दिंडी’तील २७ वारकऱ्यांचे पथक घेऊन दिंडीत सहभागी झाले होते.

 

चिपळूण

दिंडीत सहभागी झालेले सनातनचे प्रथमोपचार पथक

 

फोंडा येथील दिंडीच्या वेळी आलेले अनुभव !

१. रोजंदारीवरील कामगारांचा दिंडीप्रती जाणवलेला भाव : ‘दिंडी फोंडा शहरातील दादा वैद्य चौकातून जात असतांना रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराने दिंडीला अत्यंत भावपूर्ण नमस्कार केला. तो पाहून माझी भावजागृती झाली, तर अन्य एक कामगार आपल्या हातातील काम सोडून दिंडीत सहभागी झाला. तो दिंडीच्या अखेरीस झालेल्या समारोपीय भाषणापर्यंत थांबला होता.

२. गरीब महिलेने स्वतःकडील थोडी रक्कम भावपूर्ण अर्पण करणे : एका मध्यमवयीन महिलेने दिंडीतील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पालखीचे भावपूर्ण दर्शन घेतले. ती महिला माझ्याजवळ येऊन तिने स्वत:कडील थोडी रक्कम माझ्या हाती सोपवून कन्नड भाषेत ते गुरुदेवांच्या पालखीत अर्पण करण्यास सांगितले.

‘देव भावाचा भुकेला असतो,’ याची मला प्रचीती आली.’

– श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.

 

कर्नाटक राज्यातील विशेष अभिप्राय

१. पुत्तुर (कर्नाटक) येथील हिंदू एकता दिंडीच्या वेळी सुरक्षेसाठी उपस्थित असलेले पोलीस साधकांना म्हणाले, ‘‘तुम्ही आणखी लोकांना जोडू शकता. आम्ही तुम्हाला साहाय्य करू.’’

२. ‘सनातन संस्था हिंदु धर्म आणि राष्ट्र यांची सेवा नि:स्वार्थपणे करत आहे. सनातनच्या कार्याला प्रत्येक घरातून सहकार्य मिळणे आवश्यक आहे.’ – आमदार श्री. दिनकर के. शेट्टी, कुमटा-होन्नावर विधानसभा मतदारसंघ, कर्नाटक.

एका जिल्ह्यात हिंदू एकता दिंडीच्या शेवटी साधकांनी पोलिसांना विचारले की, ‘तुम्हाला आमच्याकडून काही त्रास झाला का ?’ तेव्हा पोलीसच साधकांना म्हणाले, ‘‘आमच्याकडून तुम्हाला काही त्रास झाला असेल, तर क्षमस्व !’’

(पोलीस खात्यातही असे सत्शील आणि अंतर्मुख होणारे सेवक आहेत, हे या उदाहरणातून लक्षात येते ! अशा कर्मचाऱ्यांमुळे पोलीस दलाचे चांगलेपण अजूनही टिकून आहे. सनातन कधीही कोणत्याही विभागाविरुद्ध द्वेष प्रसारित न करता त्यामधील अपप्रवृत्तींविरुद्ध सनदशीर मार्गाने जागृती करते ! – संपादक)

Leave a Comment