आध्यात्मिक स्तरावरील आणि मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणार्‍या विचारांशी निगडित अर्थपूर्ण बाटिक नक्षी असणारी विविध देशांतील वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रे !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली
महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या गटाचा ‘दक्षिण-पूर्व आशियायी देशांचा अभ्यासदौरा’

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

‘इंडोनेशियातील लोक विविध प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण बाटिक नक्षी असलेले कपडे वापरतांना दिसतात. याविषयीची माहिती घेतांना लक्षात आले, ‘प्रत्येक प्रकारच्या नक्षीला वेगळा अर्थ आणि वेगळे महत्त्व आहे.’ ‘सत्त्व-रज-तम या त्रिगुणांनुसार सात्त्विक नक्षी कशी असावी ?’, हे जरी तेथील लोकांना ठाऊक नसले, तरी बुद्धीने का होईना; पण त्यांनी मानवी जीवनातील विविध प्रसंगांनुरूप आणि आध्यात्मिक दृष्टीनेही दैवी कृपा प्राप्त होण्याचा विचार लक्षात घेऊन केलेला हा प्रयत्न वैशिष्ट्यपूर्ण, महत्त्वाचा आणि अभ्यास करण्याजोगा वाटतो. इंडोनेशियाप्रमाणेच मलेशियातही आपल्याला असे वैशिष्ट्यपूर्ण बाटिक नक्षीचे कपडे पहायला मिळतात.

दैवी कृपा प्राप्त झाल्याचे दर्शवणारी आणि दैवी कृपा संपादन करण्याचे स्मरण देणारी नक्षी

 

‘या जगातील खरी शांतता साध्य करण्यासाठी सदैव प्रयत्नरत राहिल्याने आयुष्य प्रेम आणि सुंदरता यांनी नटते’, असा संदेश देणारी नक्षी

 

‘व्यक्तीने धैर्यवान आणि शक्तीवान असायला हवे’, असा संदेश देणारी नक्षी

 

पाण्यासारखे सर्वत्र मिसळून जाणारे, सर्वांशी जमवून घेणारे व्यक्तीमत्त्व दर्शवणारी नक्षी

 

ज्यावर विश्‍वास ठेवू शकतो, असे उत्तरदायी आणि मानकरी व्यक्तीमत्त्व दर्शवणारी नक्षी

 

या वस्त्रावर हत्तीचे चित्र आहे. हत्ती हा बळाचे दर्शक आहे. वज्रासारखे शक्तीमान, नेतृत्वगुण असलेले आणि उत्तरदायी व्यक्तीमत्त्व दर्शवणारी नक्षी

 

कोणताही आजार म्हणजे शरिरात झालेला बिघाड. हा बिघाड दूर करून आरोग्य प्राप्त होण्यासाठी आजारी व्यक्तींना पांघरण्यासाठीच्या वस्त्रावरील नक्षी

 

या वस्त्रात दोन रंग आहेत. उजळ रंग सकाळी घालण्यासाठी आणि गडद रंग दुपारी घालण्यासाठी. ‘सदैव आनंदी रहाण्यासाठी हे जीवन असून प्रामाणिकपणे केलेल्या त्यागामुळे जीवनात पुढे आनंदच मिळतो’, असे सांगणारी नक्षी

 

कापडावरील ही नक्षी डच संस्कृतीने प्रेरित असून त्यांच्या पूर्वीच्या दैनंदिन कृती दर्शवणारी आहे

 

‘जीवनात मिळणारे ज्ञान महत्त्वपूर्ण असते; म्हणून ज्ञानसंपन्न आयुष्य जगावे’, असे सांगणारी नक्षी

 

विवाहाचे आणि सृजनशीलतेचे प्रतीक, साखरपुड्याच्या वेळी घालण्यासाठीच्या कापडावरील नक्षी

 

चीनमधील व्यापारीवर्गाने राजमहालात होणार्‍या कार्यक्रमांना उपस्थित रहाण्यासाठी घालण्याच्या वस्त्रावरील नक्षी

– श्री. दिवाकर आगावणे, सिंगापूर (११.४.२०१८)

Leave a Comment