१२ व्या शतकाच्या शेवटी जयवर्मन राजाने (सातव्या) आईसाठी बांधलेले ता-फ्रोम् मंदिर !

Article also available in :

१. जयवर्मन राजाने (सातव्या) त्याच्या आईसाठी बांधलेल्या मंदिरात
बौद्ध धर्मातील प्रज्ञापरमिता या विद्यादेवतेची मूर्ती (श्री सरस्वती देवीसारखी) ठेवणे

बापून मंदिराला भेट दिल्यानंतर आम्ही अंकोर थाम मंदिराच्या परिसराच्या पूर्वेकडे असलेल्या जगप्रसिद्ध ता-फ्रोम् मंदिरात गेलो. १२ व्या शतकाच्या शेवटी जयवर्मन राजाने (सातव्या) त्याच्या आईसाठी हे मंदिर बांधले असावे, असे सांगितले जाते. खरेतर हे मंदिर म्हणजे बौद्ध राजविहार आहे. जयवर्मन राजाच्या वेळी खमेर साम्राज्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव वाढत चालला होता. त्या वेळी बांधलेल्या या मंदिरात बौद्ध धर्मातील प्रज्ञापरमिता या विद्यादेवतेची मूर्ती ठेवली असेल, असे म्हटले जाते. थोडक्यात हे मंदिर एक गुरुकुल होते आणि येथे श्री सरस्वती देवीसारखी प्रज्ञापरमिता या विद्यादेवतेची मूर्ती मध्यभागी ठेवण्यात आली होती.

 

२. ता-फ्रोम् मंदिराला राक्षसी स्वरूपाच्या वृक्षांनी
विळखा घातल्याने ते जगप्रसिद्ध होणे, खमेर साम्राज्याचे
पतन झाल्यानंतर ३०० वर्षे संपूर्ण अंकोर परिसरात केवळ जंगलच
निर्माण होणे, तेथील वृक्षांची भूमीच्या वर असलेली मुळे राक्षसी अन्
ते एखाद्या वास्तूलाही विळखा घालतील, अशी दैत्य आकाराची असणे

 

अंकोर परिसरात असलेल्या जगप्रसिद्ध तो-फ्रोम मंदिराला राक्षशी स्वरूपाच्या वृक्षाच्या मुळांनी अशा प्रकारे विळखा घातला आहे.
तो-फ्रोम मंदिरापाशी उभे असलेले डावीकडून श्री. आगावणे, श्री. शानभाग, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, श्री. देवेंद्र सिंह सूद आणि श्री. कणगलेकर

गेल्या ३० वर्षांत हे मंदिर जगप्रसिद्ध बनले आहे; कारण या मंदिराला राक्षसी स्वरूपाच्या वृक्षांनी विळखा घातला आहे. १५ व्या शतकात खमेर साम्राज्याचे पतन झाल्यानंतर संपूर्ण अंकोर परिसरात ३०० वर्षे केवळ जंगलच होते. या जंगलाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील एकेक वृक्षांची उंची राक्षसी आहे. हे वृक्ष एवढे उंच होतात की, त्यांची भूमीच्या वर असलेली मुळेही राक्षसी दिसतात, तसेच ती मुळे एखाद्या वास्तूलाही विळखा घालतील, अशी दैत्य आकाराची आहेत. या मंदिराच्या अवतीभोवती असलेले वृक्ष एवढे मोठे झाले आहेत की, ते मंदिराला आलिंगन देत आहेत, असे जाणवते.

 

३. मंदिराच्या पुनर्निर्माणाचे कार्य कंबोडिया
सरकारने भारतीय पुरातत्व विभागाकडे सोपवणे,
मंदिराचे पुनर्निर्माण केलेले मुख्य वास्तूविशारद आणि
अभियंता श्री. देवेंद्र सिंह सूद यांची सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी
भेट होणे अन् श्री. सूद यांनी वास्तूच्या पुनर्निर्माण कार्याविषयी माहिती देणे

वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे संपूर्ण पडलेल्या स्थितीत असलेल्या या मंदिराच्या पुनर्निर्माणाचे कार्य कंबोडिया सरकारने वर्ष १९८४ मध्ये भारताकडे सोपवले आणि भारतीय पुरातत्व विभागाने हे काम अतिशय कष्टाने पूर्ण केले. या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या जवळच भारतीय पुरातत्व खात्याचे कार्यालय, एक मोठी मूर्तीशाळा आणि एक छोटे वस्तूसंग्रहालय आहे. येथे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी भारतीय पुरातत्व विभागाचे निपुण तथा या मंदिराचे पुनर्निर्माण केलेले मुख्य वास्तूविशारद अन् अभियंता श्री. देवेंद्र सिंह सूद आणि त्यांच्या पत्नी यांची भेट घेतली. या वेळी श्री. सूद यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना ता-फ्रोम् मंदिराचा इतिहास आणि या सर्वांत कठीण वास्तूच्या पुनर्निर्माणाचे कार्य भारताने कशा पद्धतीने केले ?, याविषयी माहिती दिली.

– श्री. विनायक शानभाग, कंबोडिया

भारतापासून ४ सहस्र किलोमीटर लांब असलेल्या कंबोडियात पूर्वीपासून हिंदु संस्कृती कशी विद्यमान होती, ते आम्हाला जवळून बघण्याचे भाग्य लाभले. यासाठी आम्ही महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.

(सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

Leave a Comment